शेवटच्या क्षणीही मी तुझा तिरस्कार करू शकलो नाही, पत्नीसाठी भावनिक पोस्ट लिहून पतीने जीवन संपवले
तु जेव्हा हे वाचशील तोपर्यंत मी गेलेलो असेन. तु जे काही केलेस त्यासाठी मी तुझा तिरस्कार करायला हवा होता, पण मी नाही करू शकलो, हे शब्द आहेत मुंबईतील तरुण निशांत त्रिपाठी याचे. निशांतने पत्नीच्या त्रासाला कंटाळून मुंबईतील सहारा हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे. त्याने आपल्या कंपनीच्या वेबसाईटवर एक सुसाईड नोट लिहली असून त्याच्या मृत्यूसाठी त्याची पत्नी अपूर्वा पारिख आणि तिची मावशी प्रार्थना मिश्रा यांना जबाबदार धरले आहे.
निशांत त्रिपाठी हा 41 वर्षांचा होता. तीन दिवसांपूर्वी त्याने सहारा हॉटेलमध्ये एक रुम बुक केलेला. त्या रुम बाहेर त्याने डु नॉट डिस्टर्बचा बोर्ड लावलेला. मात्र बराच वेळ झाला तरी निशांतच्या रुममध्ये काहीच हालचाल न जाणवल्याने हॉटेलच्या स्टाफने मास्टर की ने रुमचे दार उघडले. आतमध्ये निशांत त्यांना मृतावस्थेत आढळून आला. निशांतने मृत्यूआधी त्याच्या कंपनी वेबसाईटवर एक पोस्ट लिहली आहे.
त्यात निशांत म्हणतो की, तुला जेव्हा हे पत्र मिळेल तोपर्यंत मी गेलेलो असेन. माझ्या शेवटच्या क्षणीही तु जे काही केले त्यासाठी मी तुझा तिरस्कार करायला हवा होता. पण ते मला शक्य झाले नाही. या क्षणीही मी प्रेम निवडलं. मी तेव्हाही तुझ्यावर प्रेम केलं आताही तुझ्यावर प्रेम केलं. आणि मी तुला दिलेल्या वचनानुसार ते कधीच कमी होणार नाही. या नात्यामुळे मला किती त्रास झाला हे माझ्या आईला माहित आहे. माझ्या मृत्युला तू आणि तुझी प्रार्थना मावशी जबाबदार आहे. आता मी तुझ्याकडे भिक मागतो की माझ्या आईला त्रास देऊ नका. ती आता खचलेली असेल तिला किमान शांततेने माझ्या मृत्युचं दुख करू द्या”, अशी पोस्ट निशांतने लिहली आहे.
गेली अनेक वर्ष महिलांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या नीलम चतुर्वेदी यांचा निशांत हा मुलगा होता. निशांतच्या मृत्यूने नीलम यांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी नीलम यांच्या तक्रारीनंतर अपूर्वा पारिख आणि तिची मावशी प्रार्थना मिश्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आङे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List