घरातील कर्ता माणूस गेला, पण आरोपी सापडेना; 56 दिवसानंतरही पसार कारचालकाचा खडकी पोलिसांनी थांगपत्ता लागेना

घरातील कर्ता माणूस गेला, पण आरोपी सापडेना; 56 दिवसानंतरही पसार कारचालकाचा खडकी पोलिसांनी थांगपत्ता लागेना

‘घरातील एकमेव कर्ता माणूस अपघातात गेला, त्यामुळे कुटुंबीयांचा आधार गेला. मात्र, घटनेला 56 दिवस उलटल्यानंतरही पसार झालेल्या कारचालकाचा खडकी पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही. 7 जानेवारी रोजी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाकडेवाडी भागात ही घटना घडली होती.

रामदास दामोदर कडू (वय – 56, रा. पीएमसी कॉलनी, वाकडेवाडी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत त्यांच्या पत्नी उज्ज्वला (वय – 48) यांनी खडकी पोलिसांत फिर्याद दिली. 7 जानेवारी रोजी मध्यरात्री 12च्या सुमारास वाकडेवाडी येथील बजाज गार्डनच्या पुढील कॉर्नरला ही घटना घडली.

फिर्यादी यांचे पती रामदास कडू हे प्रिटिंग मशीन रिपेअरिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. घरात ते एकटेच कमवते होते. 22 वर्षीय मुलगी आणि पत्नीसह ते वाकडेवाडी येथे राहायला होते. ६ जानेवारी रोजी सकाळी ते आकुर्डी येथे कामाला गेले. रात्री उशिरापर्यंत ते परत न आल्याने पत्नीने त्यांना कॉल केला, तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने त्यांचा फोन उलचला आणि रामदास कडू यांचा वाकडेवाडी भागात अपघात झाल्याचे सांगितले. त्या क्षणी पत्नी आणि मुलीने घटनास्थळी धाव घेतली.

कडू यांना उपचारांसाठी जवळील सह्याद्री रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर जखमी झाल्याने 11 जानेवारी रोजी उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घरची परिस्थिती हलाखीची, त्यातच उपचारांना मोठा खर्च झाल्याने कुटुंबीयांनी उसने पैसे घेऊन त्यांच्यावर उपचार केले. दरम्यान, घटना घडल्यानंतरही खडकी पोलिसांना अद्यापि आरोपीचा शोध लागलेला नाही. याबाबत तपास सुरू असल्याचे खडकी पोलिसांकडून सांगण्यात आले.

कुटुंबीयांकडून पोलीस आयुक्तांची भेट

अपघाताची घटना घडल्यानंतर लगेचच 15 जानेवारी रोजी कुटुंबीयांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली होती. ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणी अपघाती मृत्यू होऊन अद्यापि आरोपी पकडला जात नसल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा कुटुंबीयांनी सोमवारी (3 रोजी) पोलीस आयुक्तांची भेट घेतली. मात्र, अद्यापि आरोपी पकडण्यात पोलिसांना यश येऊ शकले नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चालकानेच केमिकलच्या सहाय्याने बस पेटवली,हिंजवडीत आगीची दुर्घटना नाही तर घातपात; पगारवाढ न मिळाल्याने भयंकर कृत्य चालकानेच केमिकलच्या सहाय्याने बस पेटवली,हिंजवडीत आगीची दुर्घटना नाही तर घातपात; पगारवाढ न मिळाल्याने भयंकर कृत्य
हिंजवडी आयटी पार्कमध्ये व्योम ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रव्हलर बसला आग लागून चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेला धक्कादायक कलाटणी...
‘स्टॅच्यू मॅन’ राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’; वयाच्या 100व्या वर्षी राज्याचा सर्वोच्च सन्मान
दिशाभूल करू नका खोट्याचा नायटा कराल तर बूमरँग होईल! उद्धव ठाकरे यांचा इशारा
हिंमत असेल तर संजय राठोड, जयकुमार गोरे, सोमय्याबद्दल तोंड उघडा, शिवसेनेचा सरकारवर हल्ला… सभागृह तीनदा ठप्प
विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती पक्षपाती, महाविकास आघाडीची राज्यपालांकडे तक्रार
कर्मयोगी बाबा! आम्हा सर्व कुटुंबीयांसाठी हा आनंदाचा क्षण – अनिल राम सुतार
औरंगजेबाच्या संरक्षणासाठी मोदी सरकार धावले! कबरीच्या सभोवती पत्रे ठोकले; कुणी उडी मारू नये म्हणून पत्र्यांवर तारेचे कुंपण