जामठ्यावर शोरीचा शोर अन् जोर, विदर्भची 400च्या वर धाव

जामठ्यावर शोरीचा शोर अन् जोर, विदर्भची 400च्या वर धाव

43 व्या रणजी जेतेपदाच्या दिशेने सुसाट वेगाने धावत असलेल्या मुंबईला रणजी करंडकाच्या उपांत्य लढतीच्या पहिल्या दिवशी विदर्भचा जोरदार धक्का बसला. ध्रुव शोरीच्या 74 धावांच्या शोर अन् जोरदार खेळीमुळे विदर्भने 400 च्या दिशेने आपली पावले टाकली असून पहिल्या दिवसअखेर 5 बाद 308 अशी दमदार मजल मारली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा यश राठोड (47) व कर्णधार अक्षय वाडकर (13) हे खेळत होते.

आज जामठ्यात खऱ्या अर्थाने विदर्भच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांचा घामटा काढला. रॉयस्टन डायसने अकराव्या षटकांत अथर्व तायडेला अवघ्या 4 धावांवर बाद करून मुंबईला पहिले यश मिळवून दिले, पण त्यानंतर विदर्भचा एकही फलंदाज लवकर बाद करण्यात मुंबईच्या गोलंदाजांना यश मिळवता आले नाही. मुंबईला उपांत्य फेरीत धडक मारून देणाऱ्या शार्दुल ठाकूरला आज काहीही करता आले नाही.

मुलाणीने जमलेल्या दोघांना बाद केल्यावर मुंबईची गोलंदाजी विदर्भचा डाव तासाभरात संपवेल, अशी आशा होती. पण यश राठोड आणि कर्णधार अक्षय वाडकरने मुंबईला दिवसाच्या शेवटापर्यंत झुंजवले. 47 धावांच्या अभेद्य भागीचा खेळ करणाऱ्या राठोड-वाडकरच्या खेळामुळे विदर्भला चारशेचा टप्पाही गाठणे कठीण नाही. मुंबईच्या वेगवान माऱ्याला फारसे यश लाभले नसले तरी मुलाणी आणि शिवम दुबेने प्रत्येकी दोन-दोन विकेट घेत विदर्भच्या डावाला रोखण्याचा पराक्रम केला. उद्या विदर्भला लवकरात लवकर गुंडाळण्याचे आव्हान मुंबईच्या गोलंदाजांपुढे असले तरी ते आव्हान मोडून काढण्याचे विदर्भचे प्रयत्न असतील.

शोरी-मालेवारचा दणका

ध्रुव शोरीच्या 109 चेंडूंतील 74 धावांच्या तडाखेबंद खेळीने विदर्भच्या फलंदाजांना स्फुरण चढले. तायडे लवकर बाद झाल्यावर शोरीने पार्थ रेखडेसह 54 धावांची भर घातली आणि मग दानिश मालेवारच्या साथीने 51 धावांची भागी रचली. पहिल्या तिन्ही भागीदाऱ्यांमध्ये शोरीचाच सिंहाचा वाटा होता. 9 चौकारांसह 74 धावा करणाऱ्या शोरीची विकेट शम्स मुलाणीने काढली. त्यानंतर मालेवारने फलंदाजीची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने करुण नायरच्या साथीने 78 धावांची भागी रचत संघाला आधी 200 पार नेले. नायर 45 धावांवर बाद झाला. मग मुलाणीनेच मालेवारचा अडथळा दूर केला. त्याने 157 चेंडूंत 79 धावांची खेळी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राजीनामा देताच संभाजी भिंडेंचा धनंजय मुंडेंना सल्ला म्हणाले…. राजीनामा देताच संभाजी भिंडेंचा धनंजय मुंडेंना सल्ला म्हणाले….
बीड जिल्ह्याच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सरकारकडून सीआयडीकडे सोपवण्यात आला...
Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर? सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
‘अ परफेक्ट मर्डर’चा महिला दिन विशेष प्रयोग; एक सरळ सोपी केस की न उलगडलेलं कोडं?
समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा जबरदस्त टीझर
विवाहित दिग्दर्शकासोबत ‘प्रेमसंबंध’, गरोदर राहिल्यानंतर अभिनेत्रीने अबॉर्शनसाठी मागितली इतकी रक्कम!
‘मन सुन्न करणारे फोटो’, संतोष देशमुख हत्या प्रकरणावर ‘हास्यजत्रा’मधील अभिनेत्याचा संताप
‘छावा’ मधील बालकलाकार हुबेहूब दिसतो सलमान खान सारखा, तेच डोळे, तसेच केस…, व्हिडीओ पाहून म्हणाल…