तीनविरा येथे दरोडा घालायला स्वतःचे बॉडीगार्ड पाठवले; अलिबागचे मिंधे आमदार महेंद्र दळवींवर दरोड्याचा गुन्हा कधी दाखल होणार

तीनविरा येथे दरोडा घालायला स्वतःचे बॉडीगार्ड पाठवले; अलिबागचे मिंधे आमदार महेंद्र दळवींवर दरोड्याचा गुन्हा कधी दाखल होणार

अलिबागजवळील तीनविरा येथे मिंध्यांचे आमदार महेंद्र दळवी यांचा हरकाम्या समाधान पिंजारी यांनी सोनारावर दीड कोटी रुपयांचा दरोडा घातला. या दरोड्याचा प्लॅन शिजल्यानंतर महेंद्र दळवी यांनी घरातील एक नोकर आणि स्वतःचे दोन बॉडीगार्ड हा दरोडा घालायला पाठवले, अशी कबुलीच पिंजारी याने दिल्याने आमदार महेंद्र दळवी हेही या दरोड्यात सामील असल्याचे उघड झाले. लोकप्रतिनिधीनेच दरोडा घातल्याने अलिबागकर हादरून गेले असून या दरोड्यातील साथीदार मिंधे आमदार दळवींवर अलिबागचे पोलीस दरोड्याचा गुन्हा कधी दाखल करणार, असा सवाल रायगडवासीय विचारत आहेत.

अलिबाग-पेण मार्गावरील तीनविरा येथे मिंधे आमदार महेंद्र दळवी यांचा हरकाम्या समाधान पिंजारी याने नागपूरहून आलेल्या सोन्याचा व्यापारी नामदेव हुलगे याच्या गाडीवर दरोडा घातला आणि त्याच्या गाडीतील दीड कोटी रुपये लुटले. या दरोड्याचा प्लॅन समाधान पिंजारी याने आमदार महेंद्र दळवी यांना सांगितला होता. त्यांनी समाधानला तू एकटा जाऊ नको, सोबत माझे दोन पोलीस बॉडीगार्डही घेऊन जा, असे सांगितले आणि पोलीस कर्मचारी समीर म्हात्रे आणि विकास साबळे यांनाही या दरोड्यात मदत करण्यासाठी पाठवले.

सोन्याचे व्यापारी नामदेव हुलगे हे सोने खरेदीकरिता दीड कोटी रुपये घेऊन तीनविरा धरणाजवळ आले. तेथे हुलगे यांची कार थांबवण्यात आली. इतक्यात महेंद्र दळवी यांचे खाकी वेशातील पोलीस बॉडीगार्ड तेथे पोहोचले. यावेळी समाधान पिंजारी याने हुलगे यांना पोलीस आले आहेत तुम्ही गाडीतून खाली उतरा असे सांगितले. हुलगे गाडीतून खाली उतरताच त्यांची कार दळवींचा आणखी एक नोकर दीप गायकवाड याने पनवेलच्या दिशेने पळवून नेली.

याप्रकरणी हुलगे यांनी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोयनाड पोलिसांनी आमदार महेंद्र दळवी यांचा हरकाम्या आणि दरोडेखोर समाधान पिंजारी तसेच दीप गायकवाड यांना अटक केली. समाधान पिंजारीच्या जबाबात या दरोड्यात खुद्द आमदार महेंद्र दळवी सामील असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. त्यानंतर दळवी यांचे पोलीस बॉडीगार्ड समीर म्हात्रे आणि विकी साबळे यांच्यासह विशाल पिंजारी व अक्षय खोत यांना अटक केली.

आमदार दळवींची चौकशी का केली नाही?

या दरोड्यातील मुख्य सूत्रधार समाधान पिंजारी याने आमदार महेंद्र दळवी यांचा या दरोड्यात हात असल्याचा जबाब दिला आहे. हा दरोडा घालण्यासाठी दळवी यांनी घरातील नोकर आणि स्वतःचे दोन पोलीस अंगरक्षक पाठवल्याचे समोर आले. मात्र अद्याप आमदार दळवी यांची चौकशी का केली नाही, असा संतप्त सवाल रायगडवासीय विचारत आहेत. एकाही चोराला तसेच दरोडेखोराला सोडणार नाही अशा राणाभिमदेवी थाटातील घोषणा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. मग आमदार दळवींची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा केव्हा दाखल करणार, असा रोकडा सवाल विचारला जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राजीनामा देताच संभाजी भिंडेंचा धनंजय मुंडेंना सल्ला म्हणाले…. राजीनामा देताच संभाजी भिंडेंचा धनंजय मुंडेंना सल्ला म्हणाले….
बीड जिल्ह्याच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सरकारकडून सीआयडीकडे सोपवण्यात आला...
Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर? सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
‘अ परफेक्ट मर्डर’चा महिला दिन विशेष प्रयोग; एक सरळ सोपी केस की न उलगडलेलं कोडं?
समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा जबरदस्त टीझर
विवाहित दिग्दर्शकासोबत ‘प्रेमसंबंध’, गरोदर राहिल्यानंतर अभिनेत्रीने अबॉर्शनसाठी मागितली इतकी रक्कम!
‘मन सुन्न करणारे फोटो’, संतोष देशमुख हत्या प्रकरणावर ‘हास्यजत्रा’मधील अभिनेत्याचा संताप
‘छावा’ मधील बालकलाकार हुबेहूब दिसतो सलमान खान सारखा, तेच डोळे, तसेच केस…, व्हिडीओ पाहून म्हणाल…