तो म्हणाला होता ‘मी जिथे जातो ती जागा, शो बंद होतो’; खरंच हा कंटेस्टंट समय रैनाच्या शोसाठी पनौती ठरला?
समय रैनाचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा शो इतका अडचणीत सापडला की समयला त्याच्या शोचे सर्व एपिसोड हे डिलीट करावे लागले. युट्यूबर तथा पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया याने समय रैनाने शोमध्ये पालकांवर केलेल्या अश्लील वक्तव्यामुळे हा वाद सुरु झाला आणि तो नंतर एवढा वाढत गेला की समय रैना, रणवीर आणि शोच्या इतर सदस्यांवर गुन्हे दाखल झाले. त्यामुळे हा शो कायमच बंद करावा लागला.
‘इंडियाज गॉट लेटेंट’ च्या प्रत्येक भागात वेगवेगळे परीक्षक दिसले आहेत, तर प्रत्येक भागात वेगवेगळे स्पर्धक देखील दिसले आहेत. या शोवरील गोंधळाच्या दरम्यान, एका स्पर्धकाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतं आहे. ज्याला लोक समय रैनाच्या शोसाठी खरंच पनौती ठरला असं म्हणत आहेत.
समय रैनाच्या शोसाठी हा कंटेस्टंट खरंच ठरला पनौती?
हा स्पर्धक राखी सावंत जेव्हा शोमध्ये परीक्षक म्हणून आली होती त्या भागात दिसला होता. या स्पर्धकाची ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारण हा स्पर्धक व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहे की तो जिथे जिथे गेला ते शो किंवा ऑफिस बंद पडले. मात्र त्यावेळी त्याचे बोलणे सर्वांनी हसण्यावारीच घेतले होते.
हा शो बंद झाला तर बघ…समयने स्पर्धकाला दिली होती तंबी
पण आता त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कमेंटमध्ये सर्व युजर्सकडून अशीच प्रतिक्रिया येत आहे की ” हा कंटेस्टंट समय रैनाच्या लेटेंट शोसाठी पनौती बनू शकेल याची कल्पनाच शोच्या लोकांनी नसावी”
हा स्पर्धक जिथे जिथे गेला तिथली जागा बंद पडली
या शोमध्ये सादरीकरण करण्यासाठी आलेल्या प्रत्येक स्पर्धकाला स्वतःची ओळख करून द्यावी लागायची आणि त्याच्याकडे असलेल्या खास कलागुणांसाठी नबंरमध्ये गुण द्यायचे. तसेच स्पर्धकाला एक फॉर्म देखील भरायला दिला जायचा ज्यामध्ये त्याला स्वतःबद्दल काही प्रश्नांची उत्तरे द्यायची लिहायची असतात. या स्पर्धकानेही एका प्रश्नाच्या उत्तरात लिहिले होते की तो ‘पनौती’ आहे
India’s Got Latent वालों ने कभी नहीं सोचा होगा की ये इनके लिए भी पनौती बन सकता है
pic.twitter.com/0ApuUm2MXj
— HasnaZarooriHai
(@HasnaZaruriHai) February 11, 2025
समयच्या शोमध्ये पहिल्यांदा आला हा स्पर्धक आणि थेट शोच बंद
जेव्हा तो सर्व परीक्षकांसमोर येतो तेव्हा त्याला असं लिहिण्याचं कारण विचारलं जातं तेव्हा त्याने सांगितलं होतं की, तो जिथे जिथे गेला तिथे ती जागा बंद झाली आहे. स्पर्धकाने सांगितले की तो लहान असताना, तो ज्या शाळेत पहिल्यांदा गेला होता ती शाळा बंद पडली. मग त्याने आणखी दोन शाळा बदलल्या आणि त्याही बंद पडल्या. स्पर्धकाने पुढे सांगितले की तो ज्या कॉलेजमध्ये गेला होता तेही बंद करण्यात आलं होतं आणि ज्या इन्स्टिट्यूटमध्ये त्याने पहिलं काम केलं होतं तेही बंद झालं. त्याचे बोलणे ऐकून सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात आणि सर्वजण हसायला लागतात.
दरम्यान या स्पर्धकाने त्याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी सांगितल्यानंतर समय रैना त्याला म्हणाला देखील ,”या शोमध्ये तु आलाय मग आत हा शो जर तुझ्यामुळे बंद झाला तर लक्षात ठेवं” आणि खरंच तसं झालं का?असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. आणि सर्वजण अशीच कमेंट करत आहेत की हा स्पर्धक म्हणाला तसं खरंच तो पहिल्यांदा जिथे जातो तिथे ते काम बंद पडतं. तशाच पद्धतीने समयचा शोही बंद पडला आहे. अशा अनेक कमेंट त्या व्हिडीओवर आता येताना दिसत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List