‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात असलेला गोविंदा सुनीतासोबत लग्न मोडायलाही तयार झाला होता
अभिनेता गोविंदाने बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपलं एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा आणि त्याच्या बायकोमधील वादावर, त्यांच्या वेगळं राहण्यावर अनेक चर्चा रगंल्या होत्या. अनेक मुलाखतींचे व्हिडीही त्यांचे या दरम्यान व्हायरल झाले होते.
रील लाईफपेक्षा वैयक्तिक आयुष्यात रोमान्स जास्त
दरम्यान गोविंदा जेव्हा सुरुवातीला फिल्म इंडस्ट्रीत आला होता तेव्हा त्याच्या रील लाईफपेक्षा वैयक्तिक आयुष्यातही रोमान्स केला. एक काळ असा होता जेव्हा गोविंदाचं नाव त्याच्या अनेक सहकलाकारांसोबत जोडलं गेलं होतं. त्यातील एका अभिनेत्रीमुळे तर गोविंदाचं लग्न मोडता मोडता राहिलं होतं.
नीलम आणि गोविंदाच्या अफेअर्सच्या चर्चा
ही अभिनेत्री म्हणजे नीलम कोठारी. नीलम आणि गोविंदाने एका चित्रपटात एकत्र काम केलं आहे. त्यावेळी नीलमला गोविंदा खूप आवडू लागला होता. पण इथे तेव्हा गोविंदाचा सुनीताशी साखरपुडा झाला होता. मात्र तेव्हा गोविंदा आणि नीलम यांच्यात जवळीक वाढत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या प्रकरणाबाबत तो स्वत: द्विधा मनस्थितीत होता असंही बोललं जातं.
गोष्टी वेगाने बदलू लागल्या
खरं तर, जेव्हा सुनीता आणि गोविंदाचे लग्न झाले तेव्हा गोविंदा फारसा लोकप्रिय नव्हता आणि त्याला फारसे चित्रपटही मिळाले नव्हते. पण सुनीतासोबतच्या त्याच्या लग्नानंतर काही वर्षांनी गोविंदाला प्रचंड लोकप्रियता मिळायला सुरुवात झाली होती. त्याच्या व्यावसायिक क्षेत्रातील गोष्टी वेगाने बदलू लागल्या होत्या. गोविंदाच्या चाहत्यांची संख्याही वाढत होती.
सुनीताला गोविंदा आणि नीलमची जवळीक खटकली
दरम्यान नीलम आणि गोविंदाच्या अफेअर्सच्या चर्चा सुरु झाल्या होत्या तेव्हा गोविंदा आणि सुनीता रिलेशनमध्ये होते. नीलम आणि गोविंदाने ‘खुदगर्ज’ आणि ‘लव्ह 86’ हे चित्रपट केले आणि या चित्रपटांमध्ये दोघांमधील बॉन्डिंग दिसून आली. दोघांनाही एकमेकांबद्दल भावना होत्या. गोविंदा आणि नीलमच्या अफेअरच्या अफवाही सर्वत्र पसरली होती. मात्र ही गोष्ट जेव्हा सुनीतापर्यंत पोहोचली तेव्हा तिला हे पटलं नसल्याचंही म्हटलं जातं.
सुनीता आणि गोविंदा कसे एकत्र आले?
या अफेअर्सच्या चर्चांमुळे गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यात वाद निर्माण होऊ लागले होते. अनेक मुद्द्यांवरून त्यांच्यात मतभेद वाढू लागले होते. अशा परिस्थितीत एकदा सुनीता गोविंदाला नीलमबद्दल असं काही बोलली की रागात गोविंदाने सुनीताला त्याच्या आयुष्यातून निघून जाण्यास सांगितलं. यानंतर 5 ते 6 दिवस गोविंदा आणि सुनीता यांच्यात काहीही संवाद झाला नव्हता. तेव्हा गोविंदा आणि सुनीताचे लग्न मोडण्याच्या तयारीतच होतं.
मात्र नंतर सुनीता गोविंदाला भेटली आणि त्याला तिच्याशी लग्न करण्यास तिने राजी केलं. त्यानंतर गोविंदा आणि नीलम कोठारी यांच्यातील नातं संपल्याचं म्हटलं जातं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List