तुपात भाजलेले ड्रायफ्रुट्स अन्… प्रतिक बब्बरची बायको प्रिया बॅनर्जीचा खास फिटनेस फंडा
अभिनेत्री तथा अभिनेता प्रतिक बब्बरची झालेली बायको प्रिया बॅनर्जी सध्या फारच चर्चेत आहे. प्रतिकसोबतच्या लग्नामुळे तर तिची फारच चर्चा होताना दिसत आहे. त्यांच्या लग्नाचेही अनेक फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत.
प्रिया स्वत:ला फिट ठेवण्यासाठी नेमकं काय करते?
प्रिया हळूहळू बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करत आहे. प्रियाला काही वेब सिरीजमध्ये आणि ऐश्वर्या राय बच्चनसोबत ‘जज्बा’ चित्रपटात पाहिलं आहे. प्रिया स्वत:ला फिट ठेवण्यासाठी नेमकं काय करते याबद्दल तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. प्रिया स्वत:ला फिट ठेवण्यासाठी एका खास पद्धतीचा अवलंब करते.प्रिया आठवड्यातून फक्त तीन ते चार दिवसच व्यायाम करते. मात्र त्यामागे तिची एक कल्पना आहे. त्याचबद्दल तिने सांगितले आहे.
शरीराला थोडा आराम दिला पाहिजे
प्रिया म्हणते की आपण आपल्या शरीराला आणि स्नायूंनाही थोडा आराम दिला पाहिजे. दररोज व्यायाम करणे म्हणजे शरीरावर दबाव आणण्यासारखे आहे. जर तुम्ही तुमच्या जेवणाकडे थोडे लक्ष देऊन व्यायाम केलात तर तुम्हाला आराम वाटेल. व्यायामाबद्दल प्रियाचे काही असे विचार असल्यानं ती आठवड्यातून फक्त 3 किंवा 4 वेळाच आराम करते.
जंक फूड न खाता घरचे अन्न महत्त्वाचे
प्रियाने खाण्याबाबत सांगितले की, तिला जंक फूड आवडत नसल्याने ती ते खात नाही म्हणूनच तिचे वजन लवकर वाढत नाही. प्रिया फक्त घरी बनवलेले अन्न खातो. तिचा कोणताही विशेष आहार नाही पण नेहमीच निरोगी आणि फायबरयुक्त अन्न खाण्याचा ती प्रयत्न करते. पॅकेज्ड फूडपासून देखील ती नेहमीच दूर राहते. फक्त ताजे तयार केलेले अन्नच ती खाते. आणि तिने हाच सल्ला सर्वांना दिला आहे.
शूटिंग हीच एक कसरत
प्रियाच्या म्हणण्यानुसार जिममध्ये तासंतास वर्कआउट करून नंतर बाहेरचे अन्न खाणे बरोबर नाही. प्रिया जिममध्ये पुशअप्स करते , वेट लिफ्टिंग, स्ट्रेचिंग हा तिचा आवडता वर्कआउट आहे. पण ती कधीही तिच्या शरीराला व्यायामासाठी जबरदस्ती करत नाही. दिवसभर शूटिंग करतो, तसेच अनेक ठिकाणी कामाच्यानिमित्ताने सतत फिरणं होतं तिच्या म्हणण्यानुसार तिचा अर्धा व्यायाम तिथेच होतो. म्हणून, शरीराला विश्रांती देणे महत्वाचे आहे. तिच्यासाठी, शूटिंग हीच एक कसरत असल्याचं तिने म्हटलं आहे.
तुपात भाजलेले ड्रायफ्रुट्स
प्रियाने खाण्याबाबतही एक सल्ला दिला आहे. ती म्हणते की, सुका मेवा शरीरासाठी खूप चांगला असतो, तो त्वरित ऊर्जा देतो. जेव्हा ती शूटिंग करत असते तेव्हा खाण्या-पिण्याची वेळ ही पाळली जात नाही. म्हणूनच ती नेहमी तिच्यासोबत सुक्या मेव्यांचा एक छोटा डबा ठेवते. या डब्यात काजू, बदाम, पिस्ता, मनुका, अक्रोड आणि अंजीर, सर्वकाही मिक्स ड्रायफ्रुट्स असतात. कधीकधी, चव बदलण्यासाठी, ती तुपात हे ड्रायफ्रुटस् भाजून त्यावर थोडं मीठही घालते. ही डिशही ती नेहमी खाते.
तर अशापद्धतीने प्रियाने अगदी सोप्या पद्धतीने आपल्या शरीराला फिट कसं ठेवावं याबद्दल सांगतिलं आहे. मुख्य म्हणजे ती स्वत: देखील हेच फंडे फॉलो करते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List