”मी घाबरलो होतो, म्हणून रात्री 1 वाजता फोन देव्हाऱ्यात ठेवला”,विकीने सांगितला ‘छावा’ ट्रेलर लाँचचा खास किस्सा
छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा ‘छावा’चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज झाल्यापासून प्रत्येकाच्या मानवर राज्य करतोय. प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम आणि कौतुक या चित्रपटाला मिळताना दिसत आहे. एवढंच काय तर थिएटरमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्रीपर्यंतचे सगळे शो हाऊसफुल झालेले दिसत आहेत.
सिनेमा पाहून प्रेक्षक चांगलेच भारावून गेले आहेत. त्यात विकी कौशलचेही कौतुक होत आहे. विकीने संभाजी महाराजांची साकारलेली भूमिका पाहून सर्वांनीच त्याचं कौतुक केलं आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचंही तेवढंच कौतुक केलं जात आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय.
चित्रपटाच्या टीमला चिंता होती
चित्रपट रिलीज होईपर्यंत सर्व टीमला चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतोय याची चिंता होती. पण चित्रपट रिलीजच्या आधीही चिंता होती ती चित्रपटाच्या ट्रेलरची. कारण ट्रेलरवरूनच पहिला अंदाज येतो की चित्रपटाला प्रतिसाद कसा मिळू शकतो ते. याचा किस्सा विकी कौशलनेही सांगितला. त्याला ट्रेलर रिलीजची प्रचंड चिंता आणि भिती वाटत होती.
विकीला ‘छावा’च्या ट्रेलर लॉन्चचं टेन्शन आलं होतं तेव्हा
‘छावा’बाबत पाहिल्यानंतर विकी कौशलच्या कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती? हे जेव्हा एका मुलाखतीत त्याला विचारलं होतं तेव्हा विकीने हा किस्सा सांगितला होता. तो हा किस्सा सांगताना म्हणाला की, “छावा’चा ट्रेलर जेव्हा लाँच झाला तेव्हा मी खूप घाबरलो होतो, रात्री 1 वाजता ट्रेलर आला होता. ट्रेलर कसा आहे वगैरे या गोष्टीचं मला टेन्शन आलं होतं. कारण त्यासाठी प्रत्येकाने मेहनत घेतली होती. त्यावेळी मी इतका घाबरलो होतो की मी फोन नेऊन थेट देव्हाऱ्यात ठेवला आणि प्ले बटणं दाबलं. मी तेव्हा सगळं देवावर सोपवलं होतं. ट्रेलर कसा आहे याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. अशा पद्धतीने मी पहिल्यांदा ट्रेलर पाहिला.”
“ट्रेलर पाहिला अन् आईच्या डोळ्यात अश्रू आले”
विकी पुढे म्हणाला की, “मग मी ट्रेलर पाहिल्यानंतर माझ्या कुटुंबीयांना तो दाखवला. तेव्हा माझ्या आईच्या डोळ्यात तर अश्रू आले होते. बाबा आणि कतरिनाला ट्रेलर प्रचंड आवडला. शिवाय चाहत्यांच्या सुद्धा ट्रेलर तेव्हा पसंतीस उतरला.” असा किस्सा विकीने सांगितला होता. दरम्यान विकीने म्हटलं तसं चित्रपटासाठी सर्वांनीच मेहनत घेतली आहे. त्याची पावतीही आता प्रेक्षकांकडून मिळतेय आणि चित्रपटाच्या कमाईच्या आकाड्यामुळेही नक्कीच स्पष्ट होतेय.
दरम्यान या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिकेसाठी झोकून काम केलं आहे. त्यामुळे सकारात्म पात्र असो किंवा नकारात्मक पात्र सर्वांचचं कौतुक होताना दिसत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List