सोनाली बेंद्रेच्या नवऱ्याला पाहिलंत का? नक्की काय काम करतो,बॉलिवूडमध्येही आहे मोठं नाव
सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे. नुकतंच झालेल्या 27 फेब्रुवारी रोजी मनसेनं आयोजित केलेल्या अभिजात मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात सोनाली सहभागी झाली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांची खूप जुनी मैत्री आहे. जवळपास 30 वर्षानंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची पुन्हा भेट झाल्याचं पाहायला मिळालं. कार्यक्रमात सोनालीने केलेलं भाषण, तिने म्हटलेली कविता सर्वांबद्दलच चर्चा झाली होती.
सोनालीने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं
सोनालीने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. आता ती बॉलिवूडमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, टीव्ही विश्वात सक्रिय आहे. अनेक शोमध्ये सोनाली परीक्षकाच्या भूमिकेत दिसते. मराठमोळ्या सोनालीचा जगभरात चाहतावर्ग आहे. सहज अभिनय आणि लोभस हास्य ही तिची खासियत आहे.वयाची पन्नाशी गाठून, एवढं आजारपण झेलूनही तिचं सौंदर्य अबाधित आहे.
सोनालीचे पती काय करतात?
तसेच सोनालीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कायमच आतुर असतात. सोनालीचे पती आणि मुलगा सोशल मीडियावर फारसे सक्रीय नाहीत. त्यामुळे त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रेक्षकांचा कायम प्रयत्न असतो. सोनालीचे पती काय करतात, असे प्रश्न कायम चाहत्यांना पडत असतात.
तसेच सोनालीच्या तोंडूनही बऱ्याचदा शोमध्ये, किंवा कोणत्याही मुलाखतीत तिच्या नवऱ्याचं नाव ऐकायला मिळतं. सोनालीच्या नवऱ्याचं नाव गोल्डी बेहल असं आहे. गोल्डी प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता आणि स्क्रिन रायटर आहेत. ‘बस इतनासा ख्वाब है’,‘द्रोणा’ आणि ‘आय, मी और मैं’ या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे.
सोनाली आणि गोल्डीची ल्व्हस्टोरी
सोनाली आणि गोल्डीने 2002 मध्ये लग्न केलं होतं. गोल्डी आणि सोनाली यांची लव्हस्टोरीही फारच भन्नाट आहे. एका सिनेमाच्या सेटवर गोल्डी बेहल यांनी सोनालीला पाहिलं होतं आणि पाहताक्षणी ते तिच्या प्रेमात पडले.त्यांनी तिच्याशी फर्ल्ट करण्याचा प्रयत्न केला, पण सोनालीने त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. त्यानंतर ‘अंगारे’ या सिनेमाच्या निमित्ताने त्यांची भेट झाली. याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि मग प्रेम झालं.गोल्डी बेहल हे दिग्दर्शक रमेश बेहल यांचे सुपूत्र आहेत. गोल्डी आणि सोनाली यांना रणवीर हा एक मुलगादेखील आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List