‘छावा’ सिनेमाला मोठा फटका, 18 व्या दिवशी प्रेक्षकांनी फिरवली पाठ, कमाईचा आकडा इतक्या कोटींनी मंदावला
Chhaava Box Office Collection Day 18: अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिता मंदाना स्टारर ‘छावा’ सिनेमा गेल्या 18 दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. सिनेमाची कमाई दिवसागणिक वाढत असताना, 18 व्या दिवशी म्हणजे सोमवारी सिनेमाच्या कमाईचा आकडा अचानक मंदावला आहे. सिनेमाने 17 व्या दिवशी 25 कोटींची कमाई केली आहे. तर शनिवारी सिनेमाने जवळपास 22 कोटींची कमाई केली आहे. सलग तीन आठवडे सिनेमा चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसत आहे. पण सोमवारी फार कमी कमाई केल्याची माहिती समोर येत आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यावर आधारलेला सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी केली आणि सिनेमा नवीने विक्रम रचेल असं स्पष्ट झालं… तसं झालं देखील… ‘छावा’ सिनेमाचा फक्त भारतात नाही तर, जगभरात देखील बोलबाला पाहायला मिळत आहे.
सांगायचं झालं तर, गेल्या तीन आठवड्यापासून बक्कळ कमाई करणाऱ्या सिनेमाचा वेग मंदावला आहे. पहिल्या आठवड्यात सिनेमाने 219.25 कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात सिनेमाने 180.25 कोटींची कमाई केली. सिनेमाने 17 व्या दिवशी 25 कोटींची कमाई केली आहे. 18 व्या दिवशी मात्र सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावला आहे. 18 व्या दिवशी सिनेमाने फक्त 8.5 कोटींची कमाई केली आहे. म्हणजे 18 दिवसांमध्ये सिनेमाने भारतात 467.25 कोटींची कमाई केली आहे.
एवढंच नाहीतर, 18 व्या दिवशी 8 कोटींची कमाई करत ‘छावा’ सिनेमाने इतर हीट सिनेमांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. ‘पद्मावत’ सिनेमाने 18 व्या 8 कोटींची कमाई केली आहे. ‘बाहुबली’ सिनेमाने 18 व्या दिवशी 7.95 कोटींची कमाई केली होती.
‘ॲनिमल’ सिनेमाने 18 व्या दिवशी 5.25 कोटींची कमाई केली. ‘गदर 2’ सिनेमाने 4.6 कोटींची कमाई केली तर, ‘पिके’ सिनेमाने 18 व्या दिवशी 4.42 कोटी रुपयांची कमाई केली.
जगभरातील ‘छावा’ सिनेमाची कमाई
‘छावा’ सिनेमाच्या जगभरातील सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाने 600 कोटींचा टप्पा पार केला आहे. परदेशात सिनेमाने शनिवारी 75 कोटींची कमाई केली. रविवारपर्यंत सिनेमाने जगभरात 620 कोटींची कमाई केल्याची माहिती समोर येत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List