दर वाढवूनही एसटी तोट्यात, 350 कोटी रुपयांची देणी बाकी
राज्य सरकारने एसटीच्या दरात वाढ केली होती. त्यानंतरही एसटीची आर्थिक स्थिती बिकटच आहे. एसटीकडे 350 कोटी रुपयांची देणी थकली असून कर्मचाऱ्यांचे PF ची रक्कम कापूनही ती भरलेली नाही.
एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य सरकारने एसटीच्या दरात 14 टक्क्यांनी वाढ केली होती. ही वाढ केल्यानंतरही एसटीची आर्थिक स्थिती सुधारलेली नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रोव्हिडं फंड आणि इन्शुरन्स चे हफ्ते कापूनही ही रक्कम भरलेली नाही. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी आणि डिझेलची खरेदीची बिलं थकलेली आहेत. खासगी बसचे दर कमी असल्याने एसटीच्या प्रवाशांची संख्या लाखांनी कमी झाली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List