State Budget Session 2025 : 6 हजार 585 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालेली आहे. या अधिवेशनात विविध मुद्यांवर भाष्य केलं जाणार आहे. विरोधी पक्षाकडून देखील आक्रमक भूमिका घेत सत्ताधारी पक्षांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं समजत आहे. अधिवेशनात 10 मार्चला राज्याचे अर्थमंत्री तसंच मुख्यमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तत्पूर्वी आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तब्बल 6 हजार 586 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आलेल्या आहे. त्यापैकी 931 कोटींच्या अनिवार्य मागण्या आहेत. तर 3 हजार 133 कोटींच्या केंद्र पुरस्कृत योजनांसाठीच्या मागण्या आहेत. या 6 हजार 586 कोटी रुपयांच्या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा 4 हजार 245 कोटींचा आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List