मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा मास्टर स्ट्रोक; 20 तारखेला मुहूर्त ठरणार, सर्व खासदार, आमदारांना तयार राहण्याच्या सूचना?
मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे. आता एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक समोर आला आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंंभस्नानासाठी जाणार आहेत. शिवजयंती साजरी झाल्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे. साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार, खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदेंचा मास्टर स्ट्रोक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यात आहे. कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एकप्रकारे आव्हान देणार आहे. हा एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे.
उद्धव ठाकरेंना धक्यावर धक्के
एकीकडे एकनाथ शिंदे हे आता आपल्या सर्व आमदार आणि खासदारांना घेऊन प्रयागराजला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला कुंभमेळ्यासाठी जाणार आहेत. तर दुसरीकडे त्यांचे उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के सुरू आहेत. आतापर्यंत अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे मोठे नेते राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते जितेंद्र जनावळे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते शिवसेना ठाकरे गटाचे विलेपार्लेचे उपविभाग प्रमुख होते. जनावळे हे येत्या वीस तारखेला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List