कंटेनरमध्ये लपवून घेत जात होतो 25 कोटींची अशी वस्तू, अखेर पोलिसांच्या सापळ्यात सापडला
Sandalwood smuggling Pune: पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे चंदनाची तस्करी करणाऱ्या माफियांचा पदार्फाश झाला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे चंदन जप्त करण्यात आले आहे. एका कंटेनरमध्ये लपवून हे चंदन नेले जात होते. पोलिसांनी ते कंटनेर जप्त केले आहे. त्यात 20 ते 25 कोटी रुपये किंमतीचे चंदन सापडले आहे. या प्रकरणात अर्पित सिंग नावाच्या व्यक्तीसह कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.
असा रचला सापळा
पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर बंगळुरूवरुन निघालेले एक कंटनेर जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्या कंटनेरमधून चंदनाची तस्करी केली जात असल्याचे पोलिसांच्या खबरीने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला.
कंटेनर पुणे मार्गे मुंबईच्या दिशेने जात होते. पोलिसांना ते संशयास्पद कंटेनर दिल्यावर त्याला थांबवले. त्याची चौकशी सुरु केल्यावर वाहन चालकाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला. त्यांनी कंटेनर उघडून पाहताच पोलिसांना धक्का बसला. त्या कंटनेरमध्ये मोठ्या प्रमाणावर चंदन लपवलेले होते. दहा ते बारा टन हे चंदन असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याची किंमत 20 ते 25 कोटी आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात तस्करी
बंगळुरुमधून निघालेल्या या चंदनाची आंतरराष्ट्रीय बाजारात तस्करी केली जाण्याची शक्यता आहे. मुंबई मार्गे हे चंदन आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवले जाणार होते. त्यापूर्वीच पोलिसांनी ते जप्त केले. या माध्यमातून चंदनाची तस्करी करणारे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी अर्पित सिंग या व्यक्तीला आणि वाहन चालकाला अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List