महाकुंभमध्ये कतरिना कैफचा नको तो व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीवर भडकली रवीना टंडन, व्हिडीओ व्हायरल
Katrina kaif Holy Dip at Mahakumbh: महाकुंभ संपलं आहे, पण त्या दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आजही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. महाकुंभमध्ये अनेक भक्तांसोबतच सेलिब्रिटी आणि दिग्गज लोकांनी देखील स्नान केलं. अभिनेत्री कतरिना कैफ हिने देखील 24 फेब्रुवारी रोजी प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात संगमात श्रद्धेने स्नान केलं. जेव्हा संगमात अभिनेत्री स्नान करत होती, तेव्हा अनेकांनी अभिनेत्रीला घेरलं आणि फोटो, व्हिडीओ काढण्यास सुरुवात केला. सध्या महाकुंभमधील अभिनेत्रीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
कतरिना कैफ हिला महाकुंभमधील एक व्हिडीओ पाहिल्यानंतर अभिनेत्री रवीना टंडन हिने देखील संताप व्यक केला आहे. सध्या सोशल मीडियावर कतरिनाचा एका व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये महाकुंभमध्ये आलेले काही पुरुष व्हिडीओ शूट करताना दिसत आहे. सध्या त्यांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप देखील व्यक्त केला आहे.
व्हिडीओ शूट करत एक पुरुष म्हणतो, ‘हा मी आहे.. हा माझा भाऊ आहे आणि ही कतरिना कैफ आहे…’ असं म्हणत तो पुरुष कतरिना हिच्याकडे कॅमेरा फिरवतो. त्यावेळी आजूबाजूला होणाऱ्या गोंगाटाची पर्वा न करता अभिनेत्री संगमात स्नान करताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओवर रवीना हिने देखील संताप व्यक्त केला आहे. व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत अभिनेत्री म्हणाली, ‘हे प्रचंड घृणास्पद आहे. अशा वृत्तीच्या लोकांमुळे तो क्षण पूर्णपणे खराब होतो. जो शांतेत व्यतीत होणं गरजेचं असतं.’ रवीनाने दिलेली प्रतिक्रिया सध्या तुफान चर्चेत आहे.
फक्त रवीना हिनेच नाही तर, अन्य नेटकऱ्यांनी देखील व्हिडीओवर संताप व्यक्त केला आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘याच कारणामुळे सेलिब्रिटींनी व्हीआयपी ट्रीटमेंटची गरज असते.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘हे प्रचंड भयानक आहे… लोक इतके निर्लज्ज कसे असू शकतात!”, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘आणि म्हणतात व्हीआयपी घाट का बनवला आहे…!’ सोशल मीडियावर कतरिनाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List