‘दुआ में याद रखना…?’ कॅन्सरशी झुंज देत असलेल्या हिना खानने केला पहिला रोजा पूर्ण, चाहत्यांनाही एक विनंती
अभिनेत्री हिना खानने 2025 च्या रमजानचा पहिला उपवास पूर्ण केला आहे. तिने सेहरीपासून ते इफ्तारीपर्यंतचे सर्व फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हिना खानने इफ्तारीसाठी सुंदर हिरवा सलवार कमीज घातला होता. तिने तिचा लूक सुंदर झुमक्यांनी पूर्ण केला होता.
एका फोटोमध्ये हिना खान तिच्या आईसोबत जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहे. हिनाने पोस्टला 'रमजान मुबारक, मी कशी दिसतेय, पहिला दिवस, सेहरी ते इफ्तारी पर्यंतचा सुंदर प्रवास.' कृपया तुमच्या प्रार्थनेत माझी आठवण ठेवा" असं कॅप्शनही दिलं आहे.
हिना खानने यापूर्वी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर रमजानमधील तिच्या दिनचर्येबद्दल माहिती शेअर केली होती. हिनाने तिच्या नवीन वर्कआउट सेशनची एक क्लिप देखील पोस्ट केली होती,
तिने रमजानमध्ये उपवास ठेवून तिची दैनंदिन दिनचर्या चालू ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितलं होतं. हिनाने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'मी माझा दैनंदिन दिनक्रम राखण्याचा प्रयत्न करत आहे. मी हळूहळू पुढे जात आहे. रमजानचा पहिला दिवस... कसे आहात मित्रांनो?" असं कॅप्शनही दिलं होतं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List