तुम्हीही दुपारच्या जेवणात ‘हे’ पदार्थ खात असाल तर वजन कमी करण्याचे स्वप्न विसरा
हल्ली प्रत्येकजण वजन वाढण्याच्या तक्रारी करत आहे. वाढत्या वजनाने त्रस्त झाल्याने आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश करून वजन कमी करत आहेत. यामध्ये काहीजण दुपारच्या जेवणात पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ खाण्याला प्राधान्य देतात. दुपारचे जेवण बहुतेक वेळा हेल्दी आणि संतुलित असले पाहिजे, परंतु अनेक लोकं दुपारच्या जेवनात असे काही पदार्थाचे सेवन करतात ज्याने वजन वाढवण्यास सुरुवात होते. या अन्नपदार्थांन कॅलरी आणि फॅटने समृद्ध असतात, ज्यामुळे वजन कसं वाढलं हे समजत नाही.
दुपारच्या जेवणात या पदार्थांचे सेवन केल्याने तुमच्या आरोग्यासाठी ते हानिकारक ठरू शकतात. जर तुम्ही या पदार्थांचा दुपारच्या जेवणात समावेश करत असल्यास त्याने वजन तर वाढेलच, पण ते जास्त वेळ खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात आजच्या लेखात वजन कमी करण्यासाठी तुम्ही दुपारच्या जेवणात कोणते पदार्थ सेवन न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
वजन कमी करण्यासाठी दुपारच्या जेवणात काय खाऊ नये?
दुपारच्या जेवणात तुम्ही तळलेले पदार्थ जसे की पुरी, भजी आणि तळलेले स्नॅक्स यांचा समावेश करू नका. कारण या तळलेल्या पदार्थांमध्ये कॅलरी भरपूर आणि अस्वास्थ्यकर फॅट असते. तसेच याचे सेवन केल्याने तुम्हाला वजन वाढण्यासोबतच हृदयाशी संबंधित समस्याही वाढू शकतात.
दुपारच्या जेवणात जर तुम्ही शाही पनीर किंवा मखनी डाळ यांसारख्या मलाई आणि बटरपासून बनवलेल्या ग्रेव्हीसह भाज्यांचे सेवन करणे टाळा. कारण यात जास्त कॅलरीज असतात. हे वेगाने वजन वाढवू शकतात, त्याच सोबत कोलेस्टेरॉल वाढवण्यास देखील कारणीभूत ठरतात.
दुपारच्या जेवणासोबत कोल्ड्रिंक्स किंवा साखरेचे प्रमाण जास्त असलेले ज्यूस पिणे देखील वजन वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. यामध्ये फक्त कॅलरीज असतात, ज्यामुळे आरोग्याला हानी पोहचू शकते.
दुपारी जेवण करताना रोटी किंवा परांठ्यावर तूप आणि बटरचा अतिरेकी वापर केल्याने कॅलरीज वाढते. त्यामुळे वजन तर वाढतेच पण फॅटही वाढू लागते. पांढरा भात जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढण्यास मदत होते, परंतु त्यात फायबर नसल्यामुळे त्याचा रक्तातील साखरेवरही परिणाम होतो.
दुपारच्या जेवणानंतर मिठाई किंवा पेस्ट्री खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढू शकते. यामध्ये साखर आणि ट्रान्स फॅटचे प्रमाण जास्त असते, जे आरोग्याला हानी पोहोचवते.
बटाट्यामध्ये भरपूर स्टार्च असते, यामुळे तुम्ही जर दुपारच्या जेवणात बटाट्याचे पदार्थ खात असाल तर अशाने तुमचे वजन वाढवण्यास मदत होते, मात्र बटाट्याचे सेवन जास्त प्रमाणात केल्याने आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.
आपल्यापैकी अनेकांना प्रक्रिया केलेले ब्रेड आणि चीज हे दुपारच्या जेवणात खाण्याची खूप सवय असते. तर तुम्हला वजन कमी करायचे असल्यास या पदार्थाचा सेवन करणे टाळा कारण ब्रेड आणि चीज वजन वाढवण्यास मदत करतात, मात्र त्यामध्ये असलेले प्रिझर्वेटिव्ह्ज घटक आरोग्यास हानी पोहोचवू शकतात.
इन्स्टंट नूडल्स आणि पॅकबंद खाद्यपदार्थांचे तुम्ही जर सर्वाधिक प्रमाणात सेवन करत असाल तर वेळीच थांबवा कारण यामध्ये सोडियम आणि अस्वास्थ्यकर फॅट जास्त असतात. जे वजन वाढण्यासोबतच ते आरोग्यासाठीही हानिकारक ठरतील.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List