तुमच्या ब्लड ग्रुपनुसार निवडा आहार, जाणून घ्या तज्ज्ञांनी काय सांगितले
Blood Group Diet : शाळा असो वा कार्यालय प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपल्या ब्लड ग्रुपची माहिती द्यावी लागते. पण अशी अनेक लोकं आहेत ज्यांना त्यांच ब्लड ग्रुप कोणत आहे याची माहिती नसते. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या ब्लड ग्रुपची माहिती असणे आवश्यक आहे. त्यासोबत इंटरनल मेडिसिन तज्ज्ञ यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक व्यक्तीचा ब्लड ग्रुप हा वेगळा असतो. अशा परिस्थितीत लोकांनी त्यांच्या ब्लड ग्रुपनुसार आहार घ्यावा. तुमच्या ब्लड ग्रुपनुसार तुम्ही कोणकोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करून त्यांचे सेवन करावे. त्याचबरोबर कोणत्या खादृयपदार्थांपासून दूर राहावे ते आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
A ब्लड ग्रुप
A ब्लड ग्रुप असलेल्या लोकांमध्ये संवेदनशील रोगप्रतिकारक शक्ती असते. या लोकांना संसर्ग आणि स्वयंप्रतिकार रोगांचा धोका असतो. या लोकांना शक्य तितका शाकाहारी आहार घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. A ब्लड ग्रुप च्या लोकांनी ब्रोकोली, रताळे, सफरचंद, खजूर, अंजीर, बदाम, ब्राऊन राईस, राजमा, मसूर, सोयाबीन यांसारख्या पदार्थांचे आहारात समावेश करावा.
B ब्लड ग्रुप
B ब्लड ग्रुप असलेल्या लोकांनी जास्त दूध आणि त्यापासून बनवलेले पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय कांदा, आले, ब्रोकोली, बेरी आणि ग्रीन टी यासारख्या पदार्थांचा देखील आहारात समावेश करावा. या लोकांनी प्रक्रिया केलेले मांस खाणे टाळावे.
O ब्लड ग्रुप
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या रक्तगटाच्या लोकांनी त्यांच्या आहारात उच्च प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. त्यांनी अधिक पातळ मांस, चिकन, मासे आणि फळे तसेच भाज्या खाव्यात. याशिवाय या लोकांनी संपूर्ण धान्य आणि दुग्धजन्य पदार्थ कमी खावेत. अननस आणि ब्लूबेरीसारख्या गोष्टींचा आहारात समावेश करावा, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
AB ब्लड ग्रुप
AB ब्लड ग्रुप असलेल्या लोकांची संख्या फार कमी आहे. या लोकांनी त्यांच्या आहारात ऑलिव्ह ऑईल, मासे, टोमॅटो, ब्लूबेरी, ग्रीन टी, कांदा, लिंबू, फ्लेक्ससीड यासारख्या पदार्थांचा समावेश करावा. AB ब्लड ग्रुपच्या लोकांनीही नियमित व्यायाम करावा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List