मनोज जरांगे यांची मोठी घोषणा, गावकऱ्यांच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी उचलले हे पाऊल
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज हिंगोली दौऱ्यावर होते.आजेगाव येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जरांगे पाटील यांनी महारष्ट्रातील प्रत्येक गावात लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी एका सेवकाची नियुक्ती करणार असल्याची घोषणा केली आहे. आम्ही करोडोने एकत्र आलो, मात्र गोरगरीबांच्या समस्या आणि अडी अडचणीचं काय? आरक्षणातून नोकरी आणि शिक्षणाचा प्रश्न सुटेल, पण आम्ही जे चित्र बघितलं आहे. ते गावातील समस्येचं काय ते कुणाला सांगत असतील? त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक गावात आता एक सेवक म्हणून द्यायचे आम्ही ठरवलं आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक गावातून एका सेवकाला 22 फेब्रुवारी ते 22 मार्चपर्यंत येण्याचं आवाहन जरांगे यांनी यावेळी केले आहे.
उज्वल निकम यांना कधी नेमणार
सुप्रिया सुळे बीडमध्ये येत आहेत न्याय मिळत नाही का? असा प्रश्न विचारला असता जरांगे म्हणाले की असा काय होत आहे कि तुम्हाला एक आरोपी पकडायला दोन महिने का लागत आहेत.मुख्यमंत्री सांगतात कि एकही आरोपी सुटणार नाही, यांनी पडकलेच नाहीत, त्यामुळ ते सुटायचा प्रश्न नाही असा टोला जरांगे यांनी लगावला आहे.यांनी अजून सह आरोपी बनवलेले नाहीत, त्या आरोपीना सांभाळणारे लोक असतील. उज्वल निकम यांची निवड अद्याप केलेली नाही,मग त्या चार्जशिटच पुढे काय होणार कसं होणार यात काही पोलीस अधिकारी आहेत त्यांना तुम्ही सहआरोपी किंवा निलंबित केलेले नाही.त्यामूळ संशय येतो आहे की न्याय मिळणार कसा..?
हाके यांनी अकलेनं बोललं पाहिजे
लक्ष्मण हाके यांनी दावा केला कि धस आणि मुंढे यांची जशी भेट झाली तशी जरांगे आणि कराड यांची भेट झाली होती. यावर जरांगे म्हणाले मी त्यांना विरोधक मानत नाही. त्यामुळे मी त्यांच्यावर बोलत नाही. महत्व देत नाही.अकलेनं बोललं पाहिजे. तो आमच्याकडे आला होता आणि हे त्याच्याकडे गेले होते. जेव्हा तो आला होता तेव्हा मुंडे यांनी त्याची मला ओळख करून दिली होती असे जरांगे यांनी सांगितले.
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना भेटावे का !
दिशा सालियन सारखे देशमुख यांचे आरोपी मिळत नाहीत का ? असा सवाल भाजपा मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. यावर जरांगे म्हणाले,की त्या खुनाशी या खुनाची तुलना कशी होईल ? आणि सरकार तुमचं आहे आणि तुम्ही प्रश्न विचारायचे म्हणल्यावर या राज्यातील लोकांना तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना भेटावं लागेल, असा खोचक टोला जरांगे यांनी लगावला आहे.
पोलीस आणि आरोपींची मिली भगत
देशमुख प्रकरणात पोलीस आणि आरोपींची मिली भगत आहे. त्याशिवाय एवढं मोठ प्रकरण होऊ शकत नाही.धनंजय देशमुख फोन करत होते, पोलिसांना माझा भाऊ पंधरा मिनिटात आणतो. पण ते चार तास होऊनही येत नाहीत. त्यानंतर त्यांचा खून झाल्याची बातमी येते. त्यामुळे पोलिसांपासून ते खंडणीखोरापर्यंत सगळे दोषी आहेत असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. आमची मागणी आहे. या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे नाहीतर राज्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पळाला पाहिजे अशीही मागणी जरांगे यांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List