‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतून मुख्य अभिनेत्रीची एग्झिट; आता ‘ही’ अभिनेत्री साकारणार तुळजा

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतून मुख्य अभिनेत्रीची एग्झिट; आता ‘ही’ अभिनेत्री साकारणार तुळजा

गेल्या काही दिवसांत मराठी मालिकांमध्ये बरेच बदल होताना दिसत आहेत. आधी ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधानने त्यातून एग्झिट घेतली. तिच्या जागी नव्या अभिनेत्रीची एण्ट्री झाली. त्यानंतर आता ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतही मोठे बदल घडताना दिसत आहेत. गेले जवळपास वर्षभर या मालिकेवर आणि त्यातील प्रत्येक कलाकारावर प्रेक्षकांंनी प्रचंड प्रेमाचा वर्षाव केला. आता त्यात तुळजाची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा परदेशी मालिकेला निरोप देत आहे. मालिकेतून बाहेर पडताना दिशाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“‘तुळजा’ ही भूमिका साकारताना मला खूप मज्जा आली. कारण जशी तुळजा निंबाळकर आहे, तशी दिशा परदेशी अजिबात नाहीये. तुळजा स्वावलंबी आणि निर्णय घेण्यात परिपूर्ण आहे, त्यामुळे ही भूमिका साकारत असताना एक वेगळाच आत्मविश्वास माझ्यात यायचा. तुळजाकडून मला खूप काही शिकायला मिळालं. कारण मी खासगी आयुष्यात खूप चंचल, खोडकर आहे. पण तुळजा साकारताना दिशाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना दाखवता आली. पण आता मी तुळजाची भूमिका साकारणार नाहीये. परंतु तिच्या काही गोष्टी मी माझ्या खासगी जीवनात नक्की लक्षात ठेवणार आहे,” असं दिशा म्हणाली.

मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असताना दिशा अचानक त्यातून का बाहेर पडतेय, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. त्याविषयी तिने पुढे सांगितलं, “सर्वांना प्रश्न पडला असेल की मी मालिका का सोडतेय? तर मी म्हणेन की आरोग्याच्या पलीकडे काहीही नाही आणि या कारणामुळे मला मनाविरोधात जाऊन ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेला निरोप द्यावा लागत आहे. मी खूप प्रयत्न केला यातून बाहेर पडण्याचा, पण डॉक्टरांचा सल्ला आहे की मला आरामाची गरज आहे. मी आणि मालिकेच्या टीमने खूप मेहनत घेतली तुळजा साकारण्यासाठी. मला खात्री आहे की जेवढं प्रेम तुम्ही या तुळजाला दिलं तितकंच किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रेम नवीन तुळजाला द्याल.”

“मी जरी मालिका सोडून जात असले तरी ही माझीच मालिका आहे, असं मी नेहमीच म्हणत राहीन. कारण या प्रवासात मी पहिल्या दिवसापासून जोडली गेली आहे. जरी हा प्रवास माझा इथे थांबला असेल तरी मी ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेचा सदैव भाग राहीन. तुमचा आशीर्वाद आणि प्रेम पुढच्या वाटचालीसाठी सोबत राहू दे,” अशा शब्दांत दिशाने भावना व्यक्त केल्या आहेत. आता या मालिकेत दिशाची जागा अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर घेणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

धनंजय मुंडे यांचा राजीनामा होताच देवगिरी बंगल्यावर बैठक, अजितदादा गटाचे बडे नेते पोहोचले; मोठ्या घडामोडींना वेग धनंजय मुंडे यांचा राजीनामा होताच देवगिरी बंगल्यावर बैठक, अजितदादा गटाचे बडे नेते पोहोचले; मोठ्या घडामोडींना वेग
मोठी बातमी समोर येत आहे, आज अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे...
फरहानची गोव्यात दंबगगिरी, आता ‘वॉन्टेंड गर्ल’ आयशा टाकियाची वादात उडी, थेट असे केले आरोप
पाकिस्तानी लष्करी कम्पाउंडमध्ये आत्मघातकी हल्ला; स्फोटकांच्या गाड्यांचा घडवला अपघात, 6 जणांचा मृत्यू
Champions Trophy 2025- टीम इंडियाची अंतिम फेरीत धडक; कांगारुंचा 4 गडी राखत पराभव
Hybrid इंजिन, ADAS आणि 360-डिग्री कॅमेरा फीचर्स; Volvo XC90 लॉन्च, जाणून घ्या किंमत
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा 90 दिवसांच्या आत निकाल लावा, अखिल भारतीय सरपंच परिषदेचा इशारा
रिफायनरीच्या मुद्द्यावरुन भाजप आणि मिंधे गटात संघर्ष होणार; विषय संपला म्हणणारा मिंधे गट तोंडावर आपटला