आई तुळजाभवानी, शिवाजी महाराज यांचा पाळणा म्हणताच अंगावर रोमांच उठले..

आई तुळजाभवानी, शिवाजी महाराज यांचा पाळणा म्हणताच अंगावर रोमांच उठले..

अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात क्रांती चौक येथे पाळणा गीतगायन स्पर्धा झाली. यामध्ये महिला मंडळांनी आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरील पाळणा म्हणताच प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उठले आणि अंगातील रक्त सळसळले. शिवसेनेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावर आधारित तसेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रावर आधारितसुद्धा पारंपारिक पाळणे यावेळी विविध संघांनी सादर केले. पाळणा गीत गायन सादरीकरणाच्या वेळेस संपूर्ण क्रांती चौक परिसर शिवरायांच्या स्मरणाने तल्लीन झाला होता. सर्व शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाळणा गीतांद्वारे सादर केलेल्या चरित्राने मंत्रमुग्ध झाले होते. सर्वच संघानी आपल्या पाळणा गीतांच्या माध्यमातून शिवरायांचे रोमहर्षक जीवनचरित्र, कर्तृत्व, दातृत्व व नेतृत्व श्रोत्यांच्या नजरेसमोर आणले.

जवाहर कॉलनी येथील आदर्श महिला भजनी मंडळ, विष्णूनगर येथील रामेश्वर भजनी मंडळ, जयभवानीनगर येथील संत तुकाराम महिला भजनी मंडळ, शिवाजीनगर येथील साईबाबा भजनी मंडळ, उत्तमनगर येथील गजानन महाराज भजनी मंडळ, अरिहंतनगर येथील जानकी महिला भजनी मंडळ, जाधववाडी येथील जबरे हनुमान भजनी मंडळ, भानुदासनगर येथील भोलेश्वर महिला भजनी मंडळ, कैलासनगर येथील विठाई भजनी मंडळ, शिवाजीनगर येथील स्वर सुमन भजनी मंडळ, शिवशंकर कॉलनी येथील शिवशक्ती भजनी मंडळ व पुंडलिकनगर येथील कपीश्वर भजनी मंडळ, अशा एकूण १२ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. तबला वादक म्हणून अशोक जैन तर हार्मोनिम वादक केशव मुळे यांनी सर्व पाळणा गीत स्पर्धा संघास उत्तम साथ दिली. आयोजकांच्या वतीने सर्व पाळणा गीते सादर केलेल्या संघांना मानधन आणि विविध भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या स्पर्धेचे सूत्रसंचालन महानगर संघटक सुकन्या भोसले यांनी केले. याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, उपजिल्हा संघटक सुनंदा खरात, नलिनी बाहेती, विधानसभा संघटक रेणुका जोशी, उपशहर संघटक प्रतिभा राजपूत, छाया देवराज व नुसरत जहाँ उपस्थित होत्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘राजीनामा द्या…’ फडणवीस यांचे कालच धनंजय मुंडेंना आदेश, कान उघाडणीही केली; कालच्या बैठकीतील इन्साईड स्टोरी समोर ‘राजीनामा द्या…’ फडणवीस यांचे कालच धनंजय मुंडेंना आदेश, कान उघाडणीही केली; कालच्या बैठकीतील इन्साईड स्टोरी समोर
संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, या फोटोमुळे राज्यभरात तीव्र संतापाची लाट आहे. त्यानंतर अखेर आज मंत्री...
Pune-Mumbai: मुंबई-पुणे प्रवास सुपरफास्ट, विमानाच्या नव्हे रेल्वेच्या या प्रकल्पानंतर केवळ 25 मिनिटांत प्रवास
मुंडेंच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, सरकारला थेट सवाल, म्हणाले…
मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी देवेंद्र फडणवीस सुरुवातीपासूनच आग्रही होते, पण ते…
लग्नाच्या २२ वर्षांनंतर प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा मोडला संसार, स्वत: केला खुलासा
कोंड्यापासून मुक्ती हवीये ? त्वरित करा हे उपाय
चिकन, मटन, अंड्यापेक्षा शक्तीशाली या डाळी, व्हिटॅमिन्स-प्रोटीन इतके मिळणार की विसरणार नॉनव्हेज