रणवीर अलाहाबादियाची कथित गर्लफ्रेंड निक्की शर्मा आहे तरी कोण? ब्रेकअपबद्दलची पोस्टही व्हायरल
रणवीर अलाहाबादिया सध्या चर्चेत आहे. समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये पालकांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य करणं त्याला चांगलंच भोवलं आहे. त्याच्यासह समय रैना आणि शोच्या इतर सदस्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. समय आणि रणवीरच्या अडचणी मात्र दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहेत. या वादामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
रणवीर अलाहाबादियाच्या प्रेयसीने का केलं ब्रेकअप?
अशातच या गोंदळामुळे रणवीर अलाहाबादियाच्या प्रेयसीने त्याच्याशी ब्रेकअप केल्याच्या चर्चाही येत आहेत. रणवीर अलाहाबादिया बऱ्याच दिवसांपासून त्याच्या नात्यामुळे तो चर्चेत होताच. रणवीरने गेल्या वर्षी सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले होते, त्यानंतर त्याच्या प्रेयसीच्या नावाबद्दलही चर्चा सुरू झाली.
लंडन ट्रिपचे फोटोही व्हायरल…
रणवीरने त्याच्या लंडन ट्रिपचे फोटो शेअर केले होते. त्याच्या फोटोंमध्ये त्याच्या एका मुलीचा चेहरा इमोजीने झाकला होता, परंतु त्याच्या फॉलोअर्सनी फोटोमध्ये दिसणारी मुलगी लगेच ओळखली. सर्वांनी अगदी विश्वासाने सांगितलं की ती निक्कीच आहे. रणवीर गेल्या अनेक महिन्यांपासून निक्की शर्माला डेट करत असल्याचं म्हटलं जात.
फोटोंमध्ये गर्लफ्रेंडचा चेहरा झाकला
जरी रणवीरने फोटोंमध्ये त्याच्या मैत्रिणीचा चेहरा झाकला होता, तरी निक्की शर्माने लंडनच्या रस्त्यांवर त्याच जागेचे त्याच पोशाखातील फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्यामुळे नेटकऱ्यांचा विश्वास खरा ठरला आणि पुन्हा त्यांच्या फोटोंवर कमेंट करायला सुरुवात केली. दरम्यान निक्की शर्मा टेलिव्हिजन अभिनेत्री असून ती अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.
निक्की शर्मा अनेक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री
निक्की शर्मा अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम करत आहे. ही अभिनेत्री अर्जुन बिजलानीसोबत ‘प्यार का पहला अध्याय शिव शक्ती’ या मालिकेत दिसली होती. याआधी ती ‘ब्रह्मराक्षस’, ‘ससुराल सिमर का’, ‘दहलीज’, ‘नी पाथी ना पाथी’, ‘रूप – मर्द का नया स्वरूप’, ‘जनम जनम का साथ’ यासारख्या शोचा भाग होती.
सध्याच्या वादामुळे केलं ब्रेकअप
मात्र आता रणवीर अलाहाबादियाच्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून झालेल्या वादामुळे अभिनेत्रीने त्याच्याशी ब्रेकअप केल्याचं म्हटलं जात आहे. एका वृत्तानुसार निक्की शर्मा आणि रणवीर अलाहाबादिया यांनी सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे, त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा होत आहेत.
निक्कीची पोस्ट व्हायरल
निक्की शर्माने रणवीला अनफॉलो तर केलंच आहे शिवाय नकारात्मक उर्जेबद्दल एक पोस्टही शेअर केली होती. अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘तुमचे शरीर केवळ वाईट अन्नच नाही तर नकारात्मक ऊर्जा देखील नाकारते. जर तुमचे शरीर काही ठिकाणं, लोकं किंवा गोष्टी नाकारू लागतं तर त्यावर विश्वास ठेवा आणि ते ऐका.” असं म्हणत तिने पोस्ट शेअर केली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List