हिरवळीवर चाला आणि निरोगी राहा! वाचा हिरवळीवर चालण्याचे आरोग्यासाठी खूप सारे फायदे

हिरवळीवर चाला आणि निरोगी राहा! वाचा हिरवळीवर चालण्याचे आरोग्यासाठी खूप सारे फायदे

दिवसभर फ्रेश राहण्यासाठी सकाळचा व्यायाम किंवा मॉर्निंग वाॅक करण्याचा सल्ला डाॅक्टरांकडून दिला जातो. मात्र चालण्याचा हा व्यायाम हिरवळीवर केल्यास तुमच्या आरोग्यास आणि विशेषतः डोळ्यांसाठी फारच फायदेशीर  ठरतो. मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्यासोबतच आरोग्यदायी  कारणांसाठी नक्की सकाळी हिरवळीवर चाला.

 

ताजी हवा, कोवळे ऊन आणि शांत वातावरण सकाळी असते, म्हणूनच ही वेळ व्यायामासाठी अतिशय उत्तम मानली जाते. ताज्या हवेतील ऑक्सिजन मुळे आपले स्वास्थ्य सुधारते. कोवळ्या सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन डी आपल्या शरीरास मिळते. तसेच सकाळच्या शांत वातावरणामुळे रिलॅक्स राहायलाही मदत मिळते. 

हिरवळीचा हिरवा रंग शरीरातील हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करतात. पायाच्या तळव्यावरील बिंदूवर प्रेशर येणे हे आपल्या शरीरासाठी उत्तम असते. तळव्यावर पडलेल्या प्रेशरमुळे शरीरास खूप चांगले लाभ मिळतात. विशेषतः डोळे, कान, फुफ्फुसचेहरा, पोट, मेंदू, किडनी यांचे काही पाॅईटस् हे तळव्यामध्ये असतात. त्यामुळे हिरवळीवरून चालताना या अवयवांसाठी फायदेशीर ठरते. परिणामी निरोगी स्वास्थ्यासाठी हा व्यायाम फायदेशीर ठरतो. सकाळी हिरवळीवर चालण्यामुळे शरीराचे संतुलन सुधारण्यास मदत होते. आपण चालताना शरीराचा सारा भार आपल्या पायांवर असतो. विशेषतः पहिल्या बोटावर !डोळ्यांचे आरोग्य सुधारणारे  रिफ्रॅक्सोलॉजी प्रेशर पॉईंटस दुसर्‍या आणि तिसर्‍या बोटामध्ये असते. त्यामुळे हिरवळीवर चालण्याचा सर्वाधिक फायदा डोळ्यांसाठी होतो.

 नॅचरोपॅथी ही उपचारपद्धती निसर्गातील पंचभूतांशी निगडीत असते, त्यापैकी एक म्हणजे पृथ्वी.  त्यातून येणार्‍या मॅगनेटीक लहरींमध्ये आरोग्यासाठी गुणकारी अशी उर्जा सामावलेली असते. त्याचा परिणाम मानवी शरीरावर होत असतो. पृथ्वी आणि या मॅगनेटीक लहरींच्या एकत्र येण्यामुळे शरीरातील नकारात्मकता कमी होण्यास मदत होते. परिणामी त्यातून उद्भवणारे आजार रोखण्यासही मदत होते. सकाळी अनवाणी गवतावर चालण्याचे शरीरासाठी इतके सारे फायदे आहेत. त्यामुळे आजपासून किमान १० मिनिटे तुम्ही अनवाणी चालण्याची सवय लावून घ्या. जेणेकरून तुमचे आरोग्यही उत्तम सुधारेल.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक; मुंडेंच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं? मोठी बातमी समोर फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक; मुंडेंच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं? मोठी बातमी समोर
मोठी बातमी समोर येत आहे, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे...
तारीख पे तारीख! देशभरातील न्यायालयांमध्ये 5.25 कोटींहून अधिक खटले प्रलंबित
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी तिघांना अटक, चौकशीसाठी अल्पवयीन मुलगा ताब्यात
मिंधे नाकर्ते आहेत हे वारंवार सिद्ध झालंच होतं, आज त्यावर शिक्कामोर्तब झालं! आदित्य ठाकरे यांचा घणाघात
राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्ती वाढल्या, मुख्यमंत्री मात्र मौन – सुनील प्रभू
विधानपरिषदेच्या 5 रिक्त जागेवर निवडणूक कार्यक्रम जाहीर; 27 मार्च रोजी मतदान प्रकिया
थकीत देण्यांच्या बोजाने एसटी वाकली, अर्थसंकल्पात आर्थिक पॅकेज जाहीर करा, कामगार युनियनची मागणी