तर एक दिवस मातोश्रीत फक्त… रामदास कदम यांचं जिव्हारी लागणारं भाकीत काय?

तर एक दिवस मातोश्रीत फक्त… रामदास कदम यांचं जिव्हारी लागणारं भाकीत काय?

शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर रामदासभाईंनी कोकणातून एकनाथ शिंदे गटाला जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत हल्लाबोल सुरू ठेवला आहे. प्रत्येक सभेत त्यांचा पहिला निशाणा हा उद्धव ठाकरेंवर असल्याचे प्रकर्षाने समोर आलेले आहे. आताही एका कार्यक्रमानिमित्त त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. त्यासोबतच एक मोठं भाकित केलं आहे.

एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक

काल रत्नागिरीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार सभा घेतली. त्याविषयी बोलताना एकनाथ शिंदे यांची सेना हीच बाळासाहेबांची शिवसेना असल्याचे ते म्हणाले. बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक शिंदे हेच आहेत. उद्धव ठाकरे यांचा काडीचा ही संबंध कोकणाशी नाही, असा दावा त्यांनी केला. काल कोकणातील अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला, हे सांगायला ते विसरले नाहीत.

उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका

शिल्लक असलेल्या ठाकरे गटातील अनेक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी हे एकनाथ शिंदेंकडे आले, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी एक मोठे भाकीत केले. मातोश्रीत एक दिवस असा येईल की, उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब, याच्या पलिकडे त्यांच्या पाठीशी कोणीच उभं राहणार नाही. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी द्रोह केला आहे, ते पाप त्यांनी केले आहे. त्यांनी खंजीर खुपसला आहे. ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाऊन बाळासाहेबांच्या विचारांशी व्याभिचार केल्याचा आरोप त्यांनी केला. त्या पापाची फळ उद्धव ठाकरे यांना भोगावीच लागतील असे ते म्हणाले.

बाडगा हा मोठा कडवा

त्यांनी संजय राऊतांच्या त्यांच्यावरील विधानाचा सुद्धा समाचार घेतला. संजय राऊतांच्या टीकेला महत्त्व नसल्याचे ते म्हणाले. बाडगा हा सर्वात मोठा कडवा असतो, असे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. त्यामुळे बाडगा कोण हे उद्धव ठाकरे यांनी सांगावे, असे ते म्हणाले. काँग्रेससोबत जाऊन बाडगेपणा कुणी केला, हे राऊतांनी ठाकरेंना विचारावे असा चिमटा त्यांनी काढला. राऊतांनी सकाळी पत्रकार परिषदेत कदमांवर टीका केली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक; मुंडेंच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं? मोठी बातमी समोर फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक; मुंडेंच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं? मोठी बातमी समोर
मोठी बातमी समोर येत आहे, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे...
तारीख पे तारीख! देशभरातील न्यायालयांमध्ये 5.25 कोटींहून अधिक खटले प्रलंबित
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी तिघांना अटक, चौकशीसाठी अल्पवयीन मुलगा ताब्यात
मिंधे नाकर्ते आहेत हे वारंवार सिद्ध झालंच होतं, आज त्यावर शिक्कामोर्तब झालं! आदित्य ठाकरे यांचा घणाघात
राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्ती वाढल्या, मुख्यमंत्री मात्र मौन – सुनील प्रभू
विधानपरिषदेच्या 5 रिक्त जागेवर निवडणूक कार्यक्रम जाहीर; 27 मार्च रोजी मतदान प्रकिया
थकीत देण्यांच्या बोजाने एसटी वाकली, अर्थसंकल्पात आर्थिक पॅकेज जाहीर करा, कामगार युनियनची मागणी