शरीरात व्हिटॅमिन बी12 कमतरता आहे की नाही? कोणतीही टेस्ट न करता असे ओळखा
हात आणि बोटांमध्ये सुन्नपणा येणे म्हणजे तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरता असू शकते. त्याची कमतरता दूर करण्यासाठी डोसा, इडली, चिला, अंड्यातील पिवळ बलक इत्यादी आंबवलेले पदार्थांचे सेवन करा.
आयरनची कमतरता निर्माण झाल्यावर अॅनिमियाचे संकेत मिळतात. आयरनची कमतरता दूर करण्यासाठी खजूर, हिरवी पाने, अंजीर, मोरिंगा, मनुका, काळे मनुके यासारखे लोहयुक्त पदार्थांचे सेवन करा. आयरन वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी असणारे पदार्थांच्या समावेश करा.
बोटांमध्ये सूज येणे हा संधिवातचा प्रकार असू शकतात. जे अनेकदा वृद्धावस्थेत दिसतात. यावर उपचार करण्यासाठी 1 चमचे काळ्या तिळाचे पाणी प्या आणि बिया चावून घ्या.
हातांमध्ये कंपन येणे, हात थरथरणे हे वाढत्या ताण तणावाचे लक्षण आहे. तुम्हाला चिंता आणि नैराश्य आल्याचे ते लक्षण आहे. हे दूर करण्यासाठी झोपण्यापूर्वी अश्वगंधाचा चहा घ्या.
हातांमध्ये घाम येण्याचे कारण मज्जातंतू आहे. मज्जातंतू हे घाम येण्याच्या ग्रंथी एक्राइन जास्त सक्रीय करतात. त्यासाठी अॅप्पल सायडर व्हिनेगरमध्ये भिजवा. यामुळे पीएच संतुलित करते आणि जास्त घाम कमी करते.
कोरडी किंवा भेगा पडलेली त्वचा म्हणजे एक्जिमा किंवा सोरायसिस सारखा प्रकार असण्याची शक्यता आहे. त्यासाठी ओटमील त्या त्वचेवर 15-30 मिनिटे लावा आणि त्यानंतर धुवून घ्या. यामुळे बराच दिलासा मिळेल. डिस्क्लेमर: लेखात दिलेली माहिती आणि दावे पूर्णपणे इंस्टाग्रामवर प्रकाशित केलेल्या रीलवर आधारित आहेत. कोणताही उपाय करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List