धावत्या लोकलमध्ये तरुणाचा तीन प्रवाशांवर चाकूहल्ला, कल्याणहून सुटलेल्या दादर फास्टमध्ये रक्तरंजित थराssर

धावत्या लोकलमध्ये तरुणाचा तीन प्रवाशांवर चाकूहल्ला, कल्याणहून सुटलेल्या दादर फास्टमध्ये रक्तरंजित थराssर

मुंबईकरांची लाइफलाइन असलेल्या लोकलमध्ये आज सकाळी पावणेदहा वाजता ऐन गर्दीच्या वेळी रक्तरंजित थरार घडला. कल्याणवरून दादरसाठी सुटलेल्या आणि चाकरमान्यांनी खचाखच भरलेल्या धावत्या फास्ट लोकलमध्ये एका तरुणाने तीन प्रवाशांवर अंदाधुंद चाकूहल्ला केला. या प्राणघातक हल्ल्याने अख्ख्या डब्यात हडकंप माजला. या हल्ल्यात तीन प्रवासी गंभीर जखमी झाले. इतर प्रवाशांनी मोठय़ा शिताफीने या हल्लेखोरावर झडप घालून त्याला जेरबंद केले. ठाणे आरपीएफने या माथेफिरूला अटक केली असून या घटनेने रोज जिवावर उदार होऊन लोकल प्रवास करणाऱया चाकरमान्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

अक्षय वाघ, हेमंत कांकरिया, राजेश चांगलाणी या तीन प्रवाशांनी कल्याण-दादर ही सकाळी 9.47 ची फास्ट लोकल कल्याण स्थानकावरून पकडली. याच लोकलमध्ये आरोपी शेख जिया हुसेन (19 रा. मुंब्रा) हाही कल्याण स्थानकातून चढला. त्याला मुंब्रा येथे उतरायचे होते. यावेळी ट्रेनमधील प्रवाशांनी त्याला ही फास्ट ट्रेन ही मुंब्रा येथे थांबत नाही असे सांगितले. त्यानंतर शेख जिया हुसेन याने ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केला.

तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा किंवा नैराश्यात असू शकतो

रेल्वे स्टेशन आणि ट्रेनमधील गर्दी, रोजची धावपळ यामुळे आक्रमकता वाढल्याचे दिसत आहे. अशावेळी लोकलमध्ये गर्दीत जर कुणाचा धक्का लागला किंवा एखाद्या गोष्टीवरून वाद झाला तर अनेकांचे स्वतःवर नियंत्रण राहत नाही. आज लोकलमध्ये घडलेली हल्ल्याची घटना भयंकर आहे. त्याच्याकडे चाकू होता. म्हणजे तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे का, अनामिक भीतीमुळे नैराश्यात गेल्याने तो बॅगेत चाकू ठेवतोय का, तो अमली पदार्थांच्या आहारी गेला आहे का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील. तो मानसिक आजारी असेल आणि उपचार करून घेत नसेल तरीही त्याच्यातील आक्रमकता वाढू शकते, अशी प्रतिक्रिया पालघरच्या वेदांता इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर यांनी दिली.

डोंबिवली रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल

या घटनेतील जखमी अक्षय वाघ, हेमंत कांकरिया, राजेश चांगलाणी यांना प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर राजेश चांगलाणी यांनी डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

केवळधक्का लागला म्हणून सुरू झाला वाद

यावेळी ट्रेनमध्ये गर्दी असल्याने जिया हुसेन दरवाजाजवळ जाण्यासाठी धक्काबुक्की करत होता. त्याला उतरता आले नाही. त्यामुळे त्याचा थयथयाट सुरू झाला. त्याने सहप्रवाशांना धक्काबुक्की केली आणि वादाचे रूपांतर भांडणात झाले.

एवढं संतापायला झालंय तरी काय? हा कसला ताण आहे?

सहप्रवासी त्याला समजावत असतानाही जिया शेख हुसेन याची धक्काबुक्की सुरूच होती. त्यामुळे सहप्रवाशांनी त्याला मारहाण केली. त्यानंतर जिया शेखने थेट खिशातील चाकू काढून अक्षय वाघ, हेमंत कांकरिया, राजेश चांगलाणी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यावेळी अख्ख्या डब्यात हडकंप माजला. सर्वत्र रक्त सांडले होते. इतर प्रवाशांनी प्रसंगावधान राखून शेख जिया हुसेनवर झडप घातली आणि त्याला पकडून ठेवले. अन्य प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना ही बाब कळवली. त्यानंतर ठाणे स्टेशन येताच रेल्वे पोलिसांनी शेख जिया हुसेनला ताब्यात घेऊन अटक केली. हल्लेखोराला इतके संतापायला काय झाले? तो प्रवाशांच्या जिवावरच उठला. हा कसला ताण आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रसिद्ध गायक प्रीतम यांच्या ऑफिसमधून 40 लाख लंपास करणाऱ्याच्या मुसक्या आवळ्या, चोरी करण्याचे धक्कादायक कारण समोर प्रसिद्ध गायक प्रीतम यांच्या ऑफिसमधून 40 लाख लंपास करणाऱ्याच्या मुसक्या आवळ्या, चोरी करण्याचे धक्कादायक कारण समोर
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचे प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्या ऑफिसमध्ये काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. यावेळी प्रीतम चक्रवर्ती यांच्या ऑफिसमधील 40...
Ranveer Allahbadia चं समर्थन करणं राखी सावंतला भोवलं, पोलिसांनी बजावलं समन्स
उणे 6 ते 15 अंश सेल्सिअस तापमान, रक्त गोठविणारी थंडी; कोल्हापूरच्या अन्वीने केदारकंठा शिखरावर साजरी केली शिवजयंती
“छावा चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला”, दिग्दर्शकावर गणोजी शिर्केंच्या वंशजांचे गंभीर आरोप
माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा?, मोदींचं नाव न घेता संमेलनाध्यक्ष डॉ. भवाळकर यांची टीका
हिंदुस्थानात पुढील 5 वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 2.80 कोटींहून अधिक होणार, IESA चा अहवाल
Ranji Trophy – अंतिम फेरीत विदर्भला भीडणार ‘हा’ संघ, पहिल्यांदाच फायनलमध्ये मारलीये एन्ट्री