दिल्लीत आजपासून गर्जते मराठी, मराठी हिताचे व्यापक निर्णय होणार का? छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी सज्ज

दिल्लीत आजपासून गर्जते मराठी, मराठी हिताचे व्यापक निर्णय होणार का? छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी सज्ज

>> शिल्पा सुर्वे

देशाची राजधानी दिल्लीत शुक्रवारपासून तीन दिवस मायमराठीचा महाजागर होणार आहे. त्यासाठी दिल्लीतील तालकटोरा मैदान आणि छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी सज्ज झाली आहे. दिल्लीत वर्षानुवर्षे स्थायिक असलेले मराठी बांधव आणि महाराष्ट्रातून पोचलेले साहित्यप्रेमी यांच्या उपस्थितीत तीन दिवस संमेलन रंगेल. मराठीला ‘अभिजात’ दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले संमेलन असून दिल्लीत तब्बल 70 वर्षांनी योग जुळून आल्यामुळे संमेलनाला विशेष महत्त्व आलंय. या वेळचे संमेलन सत्ताधाऱयांच्या नियंत्रणाखाली गेल्याची टीका होत आहे. व्यासपीठावर नेत्यांची गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठीच्या हिताचे कोणते व्यापक निर्णय/ठराव संमेलनात होतात, याकडे साऱयांचे लक्ष लागून राहिलंय.

दिल्लीतील तालकटोरा मैदानात 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. इतिहासात दिल्ली जिंकताना मराठ्यांचा तळ तालकटोरा मैदानात होता. त्या जागेवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा ऐतिहासिक योग जुळून येतोय. महाराष्ट्रातून आलेल्या साहित्य रसिकांच्या दिमतीला काही कमी पडू नये, म्हणून आयोजक सरहद संस्थेच्या जोडीला दिल्लीतले स्थानिक मराठी बांधव कार्यरत आहेत. दिल्लीत जागोजागी साहित्य संमेलनाचे फलक झळकत आहेत.

  • सीआयएसएफने ग्रंथदिंडीसाठी जास्तीत जास्त 20 लोकांना परिसरात प्रवेश करण्यास परवानगी दिल्याचे समजते. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे याच्या हस्ते ग्रंथदिंडीस प्रारंभ होणार असून नॅशनल बुक ट्रस्टचे चेअरमन मिलिंद मराठे, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, राज्याचे सांस्कृतिक सचिव विकास खारगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल.
  • संसद परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज व राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून ग्रंथदिंडीला प्रारंभ होईल. दिंडी तालकटोरा स्टेडियमच्या दिशेने निघेल.
  • संमेलनात 70 प्रकाशकांचा सहभाग असेल तर पुस्तक विक्रीसाठी एकूण 106 स्टॉल असतील. संमेलनात पुस्तक विक्री चांगली होत नाही, असा साधारण निराशेचा सूर असतो. दिल्ली संमेलनात सकारात्मक चित्र दिसेल, अशी अपेक्षा प्रकाशकांनी व्यक्त केली.

अशोभनीय साहित्य ‘संघ’ संमेलन

साहित्य महामंडळ आणि सरहद आयोजित 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला उद्या सुरुवात होतेय. दिल्लीत तीन दिवस चालणाऱया या साहित्य‘वजा’ संमेलनाची जोरदार चर्चा सुरू आहे. संमेलन महामंडळाचे की सरकारचे? इथून सुरू झालेला प्रवास आता साहित्य ‘संघ’ संमेलनाच्या दिशेने पोचलाय. व्यासपीठावर उपस्थित राहणाऱया आणि निमंत्रितांच्या नावांवरून याची प्रचीती येतेय. संमेलनाच्या सरकारीकरणावर खुद्द साहित्य महामंडळाच्या सदस्यांमध्ये जोरदार मतभेद आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या उद्घाटन सत्राला मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांना निमंत्रित केलेले नाही. त्यावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

70 वर्षांनी दिल्लीत होणारे संमेलन साहित्य, संस्कृती आणि ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे आहे. मात्र त्याच वेळी सत्ताधाऱयांच्या पूर्ण नियंत्रणाखाली हे संमेलन गेल्याबद्दल अनेक जणांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिल्ली संमेलनाने महामंडळाच्या अनेक प्रथा मोडल्या आहेत. संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दोन सत्रांत संमेलनाचे उद्घाटन घेण्यात येतेय. 21 फेब्रुवारीला दुपारी 3.30ला विज्ञान भवनात पंतप्रधानांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. या सोहळ्याला संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांना बोलता येणार नाही.

शुक्रवारी संध्याकाळी 6.30 वाजता उद्घाटनाचे दुसरे सत्र तालकटोरा मैदानात संमेलन स्थळी होणार आहे. या उद्घाटन सत्रात तारा भवाळकर यांचे भाषण होईल. मात्र उद्घाटन सत्राचे अध्यक्ष माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे आहेत. असे पहिल्यांदाच घडत आहे. पहिल्यांदाच एका राजकीय व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली संमेलनाध्यक्षांना भाषण करावे लागेल.

संमेलनाला निमंत्रित राहणाऱया आणि विविध परिसंवादांत भाग घेणाऱयांमध्ये ‘संघ’ प्रणित लोकांचा भरणा अधिक आहे. नुकत्याच झालेल्या विश्व संमेलनाप्रमाणे या संमेलनासाठीही मर्जीतील संस्थांवर खैरात केल्याची चर्चा आहे.

विद्यमान संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे यांची खुर्ची कुठे?

विद्यमान संमेलनाध्यक्षांनी नियोजित संमेलनाध्यक्षांना अध्यक्ष पदाची सूत्र प्रदान करणे हा मोठा सोहळा असतो. पण या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात विद्यमान संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे यांची खुर्ची कुठे आहे, असा सवाल उपस्थित झालाय. कारण पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या उद्घाटन सत्राला रवींद्र शोभणे यांना निमंत्रित करण्यात आलेले नाही. संमेलन पूर्वसंध्येपर्यंत तरी शोभणे यांना निश्चित काही सांगण्यात आले नव्हते. ‘मला बोलावले आहे, पण अद्याप अधिकृतरित्या कळवलं नाही’ असे रवींद्र शोभणे यांनी सांगितलं.

  • जाहिरातींच्या माध्यमातून राज्य सरकार साहित्यप्रेमींना संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन करत आहे. मात्र ज्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे संमेलन आहे, त्याचा साधा उल्लेखही जाहिरातीत दिसत नाही.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रसिद्ध गायक प्रीतम यांच्या ऑफिसमधून 40 लाख लंपास करणाऱ्याच्या मुसक्या आवळ्या, चोरी करण्याचे धक्कादायक कारण समोर प्रसिद्ध गायक प्रीतम यांच्या ऑफिसमधून 40 लाख लंपास करणाऱ्याच्या मुसक्या आवळ्या, चोरी करण्याचे धक्कादायक कारण समोर
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचे प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्या ऑफिसमध्ये काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. यावेळी प्रीतम चक्रवर्ती यांच्या ऑफिसमधील 40...
Ranveer Allahbadia चं समर्थन करणं राखी सावंतला भोवलं, पोलिसांनी बजावलं समन्स
उणे 6 ते 15 अंश सेल्सिअस तापमान, रक्त गोठविणारी थंडी; कोल्हापूरच्या अन्वीने केदारकंठा शिखरावर साजरी केली शिवजयंती
“छावा चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला”, दिग्दर्शकावर गणोजी शिर्केंच्या वंशजांचे गंभीर आरोप
माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा?, मोदींचं नाव न घेता संमेलनाध्यक्ष डॉ. भवाळकर यांची टीका
हिंदुस्थानात पुढील 5 वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 2.80 कोटींहून अधिक होणार, IESA चा अहवाल
Ranji Trophy – अंतिम फेरीत विदर्भला भीडणार ‘हा’ संघ, पहिल्यांदाच फायनलमध्ये मारलीये एन्ट्री