धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी आजाराने ग्रासले, दोन मिनिटेही बोलणे कठीण
वादाच्या भोवऱ्यात असलेले अन्न आणि नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांना ‘बेल्स पाल्सी’ हा आजार झाला आहे. या आजारामुळे आपल्याला सलग दोन मिनिटेही बोलता येत नसल्याची माहिती त्यांनी स्वतःच ‘एक्स’वर दिली आहे.
आपल्या दोन्ही डोळय़ांवर पंधरा दिवसांपूर्वी डॉ. तात्या लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्र्ाक्रियेनंतर दहा दिवस तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हापासून डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. याच दरम्यान ‘बेल्स पाल्सी’ नावाच्या आजाराचे निदान झाले. या आजारावर रिलायन्स हॉस्पिटलमधील डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत. या आजारामुळे मला सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलता येत नाही. या आजाराची आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कल्पना दिल्याचेही धनंजय मुंडे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List