रोज सकाळी रिकाम्या पोटी खा भिजवलेले हरभरे, रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासोबतच अनेक आजार राहतील दूर
सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले हरभारे खाण्याचा सल्ला आपल्या आई आजी देत असतात. याला तुमच्या आहाराचा भाग बनवल्याने तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतील. ही एक साधी पण अतिशय फायदेशीर सवय आहे. भिजवलेल्या हरभऱ्यामध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्वे आणि खनिज असतात. ज्यामुळे शरीर ऊर्जावान आणि निरोगी राहते. भिजवलेले हरभरे खाल्ल्याने शरीराला संपूर्ण पोषण मिळते आणि ते एक सुपर फूड देखील आहे.
सकाळी रिकाम्या पोटी मूठभर भिजवलेल्या हरभऱ्याचे सेवन केल्यास अनेक गोष्टींपासून सुटका मिळू शकते. आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर किरण गुप्ता यांच्याकडून जाणून घेऊ की दररोज सकाळी रिकाम्या पोटी मुठभर भिजवलेले हरभारे खाल्ल्याने काय फायदे होतात. किरण गुप्ता यांनी सांगितले की ज्यांची पचनशक्ती चांगली आहे ते सेवन करू शकता परंतु ज्यांना संधिवाताची समस्या आहे त्यांनी ते सवय करू नये.
रिकाम्या पोटी भिजवलेले हरभारे खाण्याचे फायदे
पचनशक्ती मजबूत करते : भिजवलेल्या हरभऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते.जे पचनसंस्थेला चांगले कार्य करण्यास मदत करते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊन पोट साफ होण्यास मदत मिळते.
शरीराला ऊर्जा मिळते : भिजवले हरभारे कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनचा एक चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे शरीर दिवसभर ऊर्जावान राहते. जी लोक व्यायाम करतात किंवा शारीरिक कष्ट करता त्यांच्यासाठी हे विशेषतः फायदेशीर आहे.
साखरेची पातळी नियंत्रित करते : हरभऱ्यात ग्लासमिक इंडेक्स कमी असतो ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा चांगला आहार मानला जातो.
हाडे मजबूत करते : हरभऱ्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. भिजवलेले हरभरे नियमित खाल्ल्याने हाडांची कमजोरी दूर होते.
रोग प्रतिकारक शक्ती वाढवते : भिजवलेल्या हरभऱ्यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि आवश्यक पोषक घटक असतात. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे आजार दूर राहतात आणि शरीर अधिक निरोगी राहते.
कसे खावे?
हरभारे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्यापोटी मुठभर हरभरे खा. तुम्हाला हवे असल्यास त्यात लिंबू, आले किंवा काळे मीठ टाकून त्याची चव वाढवू शकता. मात्र ते तसेच खाल्ले तर ते अधिक फायदेशीर ठरेल. परंतु जर तुम्हाला कोणताही आजार किंवा इतर कोणतीही समस्या असेल तर हरभरे खाण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List