यूरिक अॅसिड, किडनीच्या समस्या दूर करण्यासाठी बनवा खास अन् टेस्टी चटणी
आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात खाण्यापिण्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होतं. त्यात सततचे बाहेरचं खाणं, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, चुकीची लाइफस्टाईल, शरीराची हालचाल न करणं यामुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना लोकांना करावा लागतोय.
धकाधकीच्या आयुष्यामुळे आरोग्यावर परिणाम
यामुळे वजन वाढणे, पोटाचे, पचनाचे विकार अशा अनेक समस्या उद्भवू लागतात. यामुळे शुगर, बिपी असे आजार होतात. याचा थेट परिणाम किडनीवर होतो. त्यामुळे अनेकांना किडनीसंबंधी समस्या होतात. तसेच शरीरातील यूरिक अॅसिड वाढणे, किडनी स्टोन आणि इतर आजारांचा धोकाही वाढत चालला आहे.
अशात या समस्या दूर करण्यासाठी सतत डॉक्टरकडे जाणे किंवा सतत औषधे घेणेही एका काळानंतर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. यावर काही घरगुती उपाय असू शकतो का? तर हो. या घरगुती उपाय आहे. पण त्याआधी याचा महत्त्वाचा उपाय म्हणजे वेळेवर जेवण करणे, आणि शक्य तितके बाहेरचे खाणे टाळणे.
यूरिक अॅसिड, किडनी संबंधीच्या समस्या दूर करण्यासाठी खास चटणी
तर आता यावर असणारे घरगुती उपाय काय ते पाहू. यूरिक अॅसिड, किडनी संबंधीच्या समस्या दूर करण्यासाठी किंवा त्यांना निरोगी ठेवण्यासाठी एका खास ग्रीन चटणी बणवून तुम्ही खाऊ शकता. होय, ही चटणी चविष्ट तर आहेच पण सोबतच आरोग्यदायीही आहे. पाहुयात ही चटणी कशी बनवायची ते?
चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
कोथिंबीर, पुदीना, लसूण, आलं आणि लिंबू यांपासून चटणी तयार केली जाते. ही चटणी बनवण्यासाठी 1 कप कोथिंबीर, अर्धा कप पुदीन्याची पानं, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 1 चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा जिरे पावडर, चवीनुसार काळं मीठ आणि 1 हिरवी मिरची.
कशी बनवायची चटणी?
सगळ्या गोष्टी चांगल्या धुवून एकत्र मिक्सरमधून बारीक करा. याची चांगली पेस्ट तयार झाल्यावर त्यात मीठ टाका आणि लिंबू पिळा. नंतर ही चटणी एअर टाइट डब्यात स्टोर करून फ्रीजमध्ये ठेवा. ही चटणी रोज जेवणासोबत 1 ते 2 चमचे खाऊ शकता.ही चटणी जेवणाची चवही वाढवेल आणि आरोग्याला फायदाही देईल.
चटणीचे फायदे
या चटणीमधील साहित्यांमध्ये डाययूरेटिक गुण असतात जे यूरिक अॅसिड लघवीच्या माध्यमातून बाहेर काढण्यास मदत करतात. जस की, लिंबू आणि आले किडनी डिटॉक्स करण्यास मदत करतात. लसूण आणि आल्यामध्ये अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे सूज आणि वेदना कमी करतात.या चटणीमधील मसाल्यामुळे पचन तंत्र मजबूत राहण्यास मदत मिळते.
त्यामुळे किडनीच्या समस्या, युरिक अॅसीड यांपासून सुटका हवी असेल तर ही आरोग्यदायी चटणी रोज थोड्या थोड्या प्रमाणात किंवा तोंडी लावण्यापुरती खात जा. यामुळे जेवणाची चव वाढेल आणि आरोग्यला फायदाही होईल.
डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा
पण जर तुम्हाला फारच त्रास जानवत असेल तर चटणी तर खाच पण सोबतच डॉक्टरांचा सल्लाही घ्या आणि त्यांच्याकडून योग्य ते उपचारही सुरु ठेवा. तसेच वेळच्यावेळी बॉडी चेकअप आणि रक्त तपासणी वैगरे करून घेणे कधीही चांगले जेणेककरून आपल्या आरोग्याबद्दलची माहिती आपल्याला मिळत राहते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List