महायुतीचा पायगुण… सरकारी नोकऱ्या 16 टक्क्यांनी घटल्या, बेरोजगारी हटविण्याची घोषणा हवेतच
बेरोजगारी हटवणार, प्रत्येकाच्या हाताला काम देणार अशी भीमगर्जना करीत 2014 पासून सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्रातील सरकारी नोकऱ्यांमध्ये मात्र तब्बल 16 टक्क्यांनी घट झाली आहे. 2015 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या 5 लाख 71 कोटी होती. ही संख्या आता 4.78 वर आली आहे. शिवाय ख्रिश्चन, मुस्लीम आणि जैन या अल्पसंख्याक समुदायातील कर्मचाऱ्यांची संख्या 4.74 वरून 4.08 वर आली आहे. महायुतीच्या पायगुणामुळे ही स्थिती ओढावली असून नोकऱ्या कमी होण्याचे प्रमाण थेट 16 टक्क्यांनी कमी झाले आहे.
महाराष्ट्र सरकारच्या विविध प्रकाराच्या एकूण 7.24 जागा आहेत. मात्र महाराष्ट्र सरकारच्या अर्थ व सांखिकी संचालनालयानेच जाहीर केलेल्या आकडेवारीवरून हा चिंताजनक प्रकार समोर आला आहे. या अहवालानुसार राज्यात नोकऱ्यांची संख्या कमी झाल्याचे स्पष्ट आले आहे. सरकारच्या माध्यमातून नोकऱ्यांमध्ये वैविधता आणण्याच्या धोरणाचा फटका नोकऱ्यांना बसल्याने ही घट झाल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. मात्र विविध सामाजिक घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आखलेल्या धोरणानुसार आरक्षित गटातील कर्मचाऱ्यांची संख्या 68.4 टक्क्यांवरून 71.1 वर पोहोचली आहे.
सरकारची विविध प्रकारची खाती मिळून तब्बल 34 टक्के जागा रिक्त आहेत.
प्रति एक लाख लोकसंख्येमागे 570 पदे मंजूर असताना सध्या केवळ 377 कर्मचारी काम आहेत.
...म्हणूनच पदे घटवली
राज्याच्या 6.15 लाख कोटी अर्थसंकल्पापैकी तब्बल 35 टक्के निधी हा कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शन यावर खर्च होतो. त्यामुळेच सरकारने गेल्या काही वर्षांत टप्प्याटप्प्याने कर्मचारी कपातीचे धोरण अंमलबजावणीस सुरुवात केल्याचे स्पष्ट होत आहे.
महिलांचा टक्का मात्र वाढला
राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. कारण 2013 मध्ये हे प्रमाण 18.32 टक्के होते. हेच प्रमाण 2023 मध्ये राज्य सरकारी नोकऱ्यांमधील महिलांची संख्या 1.04 लाखांवरून 1.12 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. शिवाय आरक्षित गटातील कर्मचाऱ्यांची संख्या 68.4 टक्क्यांवरून 71.1 टक्क्यांवर पोहोचली.
धार्मिक अल्पसंख्याकमध्ये घट
अहवालानुसार धार्मिक अल्पसंख्याक कर्मचाऱ्यांची संख्या मात्र कमी झाली असून हिंदू आणि बौद्ध कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये 79.83 टक्के हिंदू आहेत, तर राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये 89.9 टक्के हिंदू कर्मचारी आहेत. 2015 मध्ये हे प्रमाण 89.1 टक्का होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List