गुजरातला अंतिम फेरीसाठी 28 धावांची गरज
दुसरा उपांत्य सामना अनिर्णितावस्थेकडे झुकला आहे. गेल्या चार दिवसांत दोन डावही पूर्ण होऊ शकले नाहीत, मात्र केरळच्या 457 धावांच्या खेळानंतर गुजरातने बुधवारी 1 बाद 222 अशी जबरदस्त सलामी दिली होती. आजही गुजरातने जयमीत पटेलच्या 74 धावांमुळे चौथ्या दिवसअखेर 7 बाद 429 अशी मजल मारली आहे. आता त्यांना पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी अवघ्या 28 धावांची गरज आहे आणि गुजरातचा खेळ पाहता ते आघाडी घेण्याची दाट शक्यता आहे. तसेच केरळला आघाडी घेण्यासाठी गुजरातचा डाव 456 धावांच्या आत बाद करणे अनिवार्य आहे. गेल्या सामन्यातही केरळ अवघ्या एका धावेच्या आघाडीमुळे उपांत्य फेरीत पोहोचला होता. आता अंतिम फेरीतही स्थान पक्के करण्यासाठी त्यांना किमान एका धावेची आघाडी घ्यावीच लागणार आहे. जलज सक्सेनाने 4 विकेट घेत झुंजार मारा केला आहे. जर उद्या केरळला आघाडी मिळवून देण्यात तो यशस्वी ठरला तर तो गुजरातसाठी फार मोठा धक्का असेल. चौथ्या दिवसअखेर गुजरातचे जयमीत पटेल (74) आणि सिद्धार्थ देसाईने आठव्या विकेटसाठी 72 धावांची भागी रचत आपली पावले अंतिम फेरीच्या दिशेने टाकली आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List