चाकूचा तुकडा अखेर मिळाला, आणखी दोघांचे जबाब नोंदवले
अभिनेता सैफ अली खान हल्लाप्रकरणी वापरण्यात आलेल्या चाकूचा तिसरा तुकडा पोलिसांनी अखेर हस्तगत केला. तपास पथकाने वांद्रे तलाव येथून तो तुकडा हस्तगत केला असून तो पुरावा म्हणून उपयुक्त ठरणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांचे जबाब नोंदवले आहेत.
अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करण्यासाठी मोहम्मद शरीफुलने चाकूचा वापर केला होता. हल्ल्यात वापरण्यात आलेला चाकू हा महत्त्वाचा पुरावा असल्याने पोलिसांनी चाकूचा तुकडा शोधण्यावर भर दिला होता. हल्ल्यानंतर त्याने तो चाकूचा तुकडा कुठे फेकला याचा शोध पोलीस घेत होते. तपास पथकाने मोहम्मद शरीफुलला वांद्रे तलाव येथे नेले. अखेर पोलिसांनी तो चाकू वांद्रे तलाव येथील गटारामधून हस्तगत केला आहे. चाकूचा तुकडा हस्तगत झाल्यावर पोलिसांनी पंचनामादेखील केला. त्या ठिकाणी मोबाईल फॉरेन्सिकची गाडीदेखील होती.
सैफ अली खान याला रुग्णालयात नेणारा रिक्षाचालक भजन सिंह राणाचादेखील जबाब नोंदवला. चाकूहल्ल्यात सैफ अली खानला रुग्णालयात भजन सिंह राणा याने नेले होते. त्यामुळे वांद्रे पोलिसांनी त्याचादेखील जबाब नोंदवला. त्याचप्रमाणे पोलिसांनी वरळी येथील सलूनमध्ये काम करणा ऱ्या आणखी एकाचा जबाब नोंदवला आहे. मोहम्मद शरीफुलने सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर तो वरळी येथे गेला. तेथे गेल्यावर त्याने एका दुकानात केस कापले होते. त्यामुळे पोलिसांनी सलूनमध्ये काम करणा ऱ्या एकाचा जबाब नोंदवला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List