अंधेरीत शिवसेनेचा भगवा झंझावात, परिसरात झेंड्यांची शोभा, भगवी वस्त्रे, टोप्या, साड्या

अंधेरीत शिवसेनेचा भगवा झंझावात, परिसरात झेंड्यांची शोभा, भगवी वस्त्रे, टोप्या, साड्या

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख पहिल्यांदाच जाहीर सभेत मार्गदर्शन करणार असल्याने मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिकांचे जथेच्या जथे अंधेरीच्या छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स मैदानात दाखल झाले. संपूर्ण परिसरात भगवे झेंडे लावण्यात आले होते, तर सभेसाठी आलेल्या शिवसैनिकांनी भगवी वस्त्रे, टोप्या, उपरणी आणि महिलांनीही भगव्या साड्या परिधान केल्या होत्या. त्यामुळे अंधेरीत शिवसेनेचा भगवा झंझावातच निर्माण झाला.

हजारोंच्या संख्येने आलेल्या बहुतांशी शिवसैनिकांच्या हातात शिवसेनेची मशाल धगधगत होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजेरी लावलेल्या जनसमुदायात जुन्या, वयस्कर शिवसैनिकांच्या निष्ठेचे अनोखे दर्शन घडले. जालना जिह्यातून अंकुश पवार व त्यांच्या सहकारी शिवसैनिकांनी मेळाव्याच्या ठिकाणी ’मशाल’ आणली होती. हे शिवसैनिक शिवतीर्थ, ‘मातोश्री’ निवासस्थान ते अंधेरीतील मेळाव्याचे स्टेडियम असा पायी प्रवास करून आले होते. पालघर जिह्यातील गुरुनाथ दुधावडे यांनी आपण बाळासाहेबांच्या विचारांचा निष्ठावंत शिवसैनिक असल्याचा अभिमान व्यक्त करणारा फलक संपूर्ण गर्दीमध्ये फिरवला.

पोवाड्यांनी वाढवली सोहळ्याची रंगत

शिवसेना मेळाव्याच्या निमित्ताने शाहीर नंदेश उमप आणि सहकाऱयांच्या पोवाड्यांचे आयोजन करण्यात आले होते. पोवाड्यांच्या माध्यमातून उमप यांनी अवघे शिवचरित्रच डोळ्यासमोर उभे केले. ’वादळ, वारा, तुफान येऊ द्या, कुणाच्या बापाला धटायचं नाय’ यांसारख्या काही पोवाडय़ांवर तर महिलांनी नाच करीत शिवसेनेच्या जोश आणि उत्साहाचे दर्शन घडवले. शिवाय विठ्ठल उमप रचित शिवसेनाप्रमुखांवरील पोवाडाही आकर्षण ठरला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय कामगार सेनेकडून शिवसेनाप्रमुखांना आदरांजली छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय कामगार सेनेकडून शिवसेनाप्रमुखांना आदरांजली
भारतीय कामगार सेना विमानतळ विभागाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, टर्मिनल-2...
मदर डेअरीची जागा अदानीच्या घशात जाऊ देणार नाही! कुर्ल्यातील रहिवाशांचे चक्का जाम आंदोलन
शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुखांना आदरांजली, राज्यभरातून शिवसैनिकांची स्मृतिस्थळावर रीघ
दहशतवादी चकमकीत अग्निवीर शहीद
वेळ येईल तेव्हा एकटं लढण्याचा निर्णय घेईन! संघ, भाजपा आणि अमित शहा यांच्यावर चौफेर हल्ला, सालटी काढली; उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ‘भारतरत्न’ द्या! शिवसेनेची केंद्र सरकारकडे मागणी
शरद पवारांच्या शेजारी बसणे अजितदादांनी टाळले, व्हीएसआयच्या कार्यक्रमात संगीत-खुर्ची