छत्तीसगडमध्ये 50 किलो आयईडी स्फोटके निकामी
छत्तीसगडमधील विजापूर येथे सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे नक्षलवाद्यांनी पेरलेली 50 किलो आयईडी स्फोटके नष्ट करण्यात यश आले. नक्षलवाद्यांनी येथील बासागुडा-आवापल्ली रस्त्यावरील पुलाखाली स्फोटके पेरली होती. गस्तीवर असलेल्या सीआरपीएफच्या जवानांच्या पथकाला ही स्फोटके सापडली. नक्षलवाद्यांनी पुलाखालील काँक्रीट काढून त्यात स्फोटके लपवली होती. आयईडी शोधण्यासाठी मेटल डिटेक्टरचा वापर करण्यात आला. अथक प्रयत्नानंतर आयईडी स्फोटके निकामी करत नक्षलवाद्यांचे मनसुबे उधळून लावले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List