जळगाव भीषण रेल्वे अपघात प्रकरण : चहा विक्रेत्याने ट्रेनला आग लागल्याची पसरवली अफवा

जळगाव भीषण रेल्वे अपघात प्रकरण : चहा विक्रेत्याने ट्रेनला आग लागल्याची पसरवली अफवा

लखनौ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवेमुळे प्रवाशांनी रेल्वे रुळावर उड्या मारल्या. त्याचवेळी विरुद्ध दिशेने बंगळुरूहून येणाऱ्या भरधाव कर्नाटक एक्स्प्रेसने 13 प्रवाशांना चिरडल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी जळगावमध्ये घडली.आता या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे.अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या एका प्रवाशाने ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा एका चहा विक्रेत्याने पसरवल्याचे सांगितले आहे.

अपघाताच्या वेळी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, एका चहा विक्रेत्याने ट्रेनला आग लागल्याची अफवा पसरवली. त्यानंतर ट्रेनमध्ये एकच गोंधळ पसरला. त्या चहा विक्रेत्याने साखळी ओढल्याने ट्रेनचा वेग कमी झाला तेव्हा प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून उड्या मारायला सुरुवात केली. पुढे सांगितले की, बंगळुरू एक्सप्रेस ज्या ट्रॅकवरून जात होती त्याचवेळी लोकांनी उड्या घेतल्याने ते चिरडले गेले. शेकडो लोकांनी दुसऱ्या बाजूला उड्या घेतल्या, जिथे ट्रॅक नव्हता. त्यांनीही या बाजूला उडी मारली असती तर आणखी लोकांचा जीव गेला असता.

पुष्पक एक्सप्रेस पूर्ण वेगाने लखनौहून मुंबईला निघाली होती. बुधवारी दुपारी 4.42 च्या सुमारास जेव्हा ट्रेन मुंबईपासून 425 किमी अंतरावर असलेल्या जळगावमधील पाचोरा स्टेशनजवळ पोहोचली तेव्हा आग लागल्याच्या अफवेने मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडली. या घटनेनंतर आता अपघातातील प्रत्यक्षदर्शींनी आणि मृतांच्या नातेवाईकांनी त्या घटनेचे वर्णन केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाळासाहेबांना अटक, अडवाणींनी फौज पाठवली… उद्धव ठाकरेंनी सर्वच काढलं बाळासाहेबांना अटक, अडवाणींनी फौज पाठवली… उद्धव ठाकरेंनी सर्वच काढलं
उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवा, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं होतं. अमित शाह यांच्या या विधानाचा समाचार...
‘जय श्रीराम’नंतर ‘जय शिवराय’ म्हटलंच पाहिजे; उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले
प्रेमाने वागाल तर उचलून देऊन, कपटाने वागाल तर… तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या काय?; ठाकरेंचा अमित शाह यांना सवाल
उद्धव ठाकरेंकडून ‘एकला चलो रे’चा नारा, नेमकं काय म्हणाले?
एक तरी निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवाच; उद्धव ठाकरेंचं उघड चॅलेंज
रुसूबाई रुसू, गावात जाऊन बसू, डोळ्यातील आसू… उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
जिनके इरादे बुलंद होते है, वही चट्टानों को गिराते है, काय म्हणाले एकनाथ शिंदे