ब्रेनरॉट

ब्रेनरॉट

अलीकडेच ऑक्सफोर्डने ‘वर्ड ऑफ द इयर म्हणून जाहीर केलेला ‘ब्रेनरॉट’ हा शब्द डिजिटल क्षेत्रात सध्या गाजत आहे. ऑक्सफोर्डने आपल्या डिक्शनरीत नव्याने या शब्दाचा समावेश केला आहे.

सोशल मीडियावर उपलब्ध होणारा सुमार दर्जाचा कॉन्टेन्ट सतत पाहिल्याने मेंदूवर होणारा परिणाम म्हणजे ब्रेनरॉट, मेंदू सडण्याची प्रकिया. सोशल मीडियावर तासन्तास रिल्स, शॉट्स स्क्रोल करणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. पण हा ब्रेनरॉट अचानक आला कठून? एआय तंत्रज्ञानाचे दुरगामी होणारे परिणाम जाणून घ्यायचे असतील तर आपल्याला ब्रेनरॉटकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

मानवी बुद्धिमत्तेतून निर्माण झालेली कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच Machine learning आणि Artificial intelligence Al हा मानवी कौशल्याचा अनोखा आविष्कारच म्हणावा लागेल. एआयमुळे सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओज् बनवणं, रिल्स करणं सहज, सोपं झालं आहे. त्यामुळे सोशल मीडियावरचा कन्टेन्टही तितक्याच प्रमाणात वाढला आहे. या व्हिडीओज्, रिल्स, शॉटस्मध्ये येणाऱ्या मराठीतल्या कॅप्शन्स, कॉन्टेन्ट हा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो.

मराठीतल्या कन्टेन्टमध्ये अनेकदा अनुस्वार, मात्रा, जोडाक्षरं यांची मोडतोड झालेली असते, शब्दशः भाषांतर झालेले असते, ज्याचा अनेकदा अनर्थ निघतो. याचं कारण म्हणजे या कॅप्शन्स एआय जनरेटेड असतात. पण यात कुणाला वावगे न वाटावे इतके हे सरावाचे झाले आहे.

सहज आणि मुख्य म्हणजे, पटकन उपलब्ध होणाऱ्या अशा व्हिडीओज्ला काही हजारोंच्या वर लाइक्स असतात, म्हणजेच हजारो लोकांपर्यंत तशाच पोहचत आहेत. हे जर असंच सुरू राहिलं तर ही अशी मोडकी तोडकी मराठी भाषा पुढच्या पिढीसाठी प्रचलित मराठी होईल की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

सोशल मीडियावर आलेला कन्टेन्ट ग्रहण करत राहणं, फक्त एवढंच काम आपल्या मेंदूला उरलं आहे. म्हणजेच पॅसिव्ह युजर, विचार करण्याची, टाईप करण्याची आणि लिहिण्याची तर त्याहूनही गरज उरलेली नाही. मग चांगलं, वाईट, शुद्ध अशुद्ध, खरं-खोटं. असा भेदाभेद ओळखण्याची आपल्या मेंदूची क्षमता दिवसेंदिवस क्षीण होणार नाही का? म्हणजेच ब्रेनरॉटचा प्रवास कुठेतरी आधीच सुरू झालाय.

Machine learning आणि Artificial intelligence यामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्यात. आपल्या शारीरिक हालचाली आधीच कमी झाल्यात. यांत्रिकीकरणामुळे ते साहजिकच होतं. पण आता प्रश्न आपल्या मेंदूचा आहे. एआयमुळे आपली लक्षात ठेवण्याची, विचार करण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. साधं उदाहरण म्हणजे कॅलक्युलेटर आल्यामुळे आकडेमोड कमी झाली.

गोष्टी सोप्या आणि वेगवान झाल्यात, पण मनुष्यप्राण्याच्या मेंदूतल्या विचारप्रक्रियेचा वेग मंदावतोय याचा विचार कोण करणार? सारासार विचार करणं कधीच थांबलंय. आता तर साध्या साध्या गोष्टी लक्षात राहत नाहीत.

एआय तंत्रज्ञानाने जशा अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत; मात्र तशीच अनेक आव्हानंही निर्माण झाली आहेत. जिथून या तंत्रज्ञानाचा जन्म झाला त्याच सॉफ्टवेअर क्षेत्रातही प्रचंड उलथपालथ होऊन अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आल्याचं म्हटलं जातं आहे. पूर्वी, अप्प्रूप वाटणाऱ्या ‘अॅलेक्सा ‘पासून सुरू झालेला हा एआयचा प्रवास शेती, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रांत वेगाने पसरतो आहे.

शेतकऱ्यांनी आता एआयची तंत्रज्ञानाची कास धरत शेतात सीसीटीव्हीबरोबरच पिकांना पाणी देण्यासाठी ऑटोमेटेड सिस्टम्स बसवायला सुरुवात केली आहे. ऑस्ट्रिलियन सामाजिक संशोधक, लोकसंख्याशास्त्रज्ञ मार्क मॅकक्रिंडल यांनी तर 2024 नंतर जन्म घेणाऱ्या मुलांना जनरेशन बिटा असं नाव दिलंय. ही नवी जेन बिटा पिढी Machine learning आणि Artificial intelligence वर सर्वात जास्त अवलंबून असणार आहे. माहितीचा प्रचंड साठा या मुलांना एका क्लिकवर उपलब्ध होईल. मोबाईल, कॉम्प्युटर, मशीन्स याचा सर्वात जास्त वापर या पिढीकडून होणार आहे असं म्हटलं जात आहे.

पण या अशा ऑटोमेटिक सिस्टमवर प्रत्येक गोष्टीसाठी अबलंबून राहणं घात करणारं आहे. ब्रेनरॉटला शुद्ध मराठी भाषेत मेंदूला गंज चढणं म्हणतात. लहानपणी एखादी गोष्टीचं विस्मरण झालं की, मेंदूला गंज चढलाय का, असं सर्रासपणे म्हटलं जायचं. अभ्यासात पटकन मिळणाऱ्या मदतीला, माहितीला स्पून फीडिंग म्हटलं जायचं. आणि हे स्पून फीडिंग वाईट समजलं जायचं.

मनुष्यप्राण्याने ज्या अवयवाचा उपयोग केला नाही तो अवयव निकामी झाला हे आपण उत्क्रांतीच्या सिद्धांतात पाहिलं आहे. भविष्यात हा मेंदूचा गंज काढण्याचं आव्हान आपल्यापुढे असेल. त्यासाठी कोडी सोडवणं, लिहिणं, वाचणं हा व्यायाम करावा लागेल. भविष्यात ब्रेन जिमची गरज प्रकर्षाने भासेल. एआयसमोर तग धरायचा असेल, आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपल्या मेंदूने विचार करणं, नवनवीन कौशल्यं आत्मसात करणं गरजेचं आहे.
(लेखिका मुका पत्रकार आहेत.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाळासाहेबांना अटक, अडवाणींनी फौज पाठवली… उद्धव ठाकरेंनी सर्वच काढलं बाळासाहेबांना अटक, अडवाणींनी फौज पाठवली… उद्धव ठाकरेंनी सर्वच काढलं
उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवा, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं होतं. अमित शाह यांच्या या विधानाचा समाचार...
‘जय श्रीराम’नंतर ‘जय शिवराय’ म्हटलंच पाहिजे; उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले
प्रेमाने वागाल तर उचलून देऊन, कपटाने वागाल तर… तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या काय?; ठाकरेंचा अमित शाह यांना सवाल
उद्धव ठाकरेंकडून ‘एकला चलो रे’चा नारा, नेमकं काय म्हणाले?
एक तरी निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवाच; उद्धव ठाकरेंचं उघड चॅलेंज
रुसूबाई रुसू, गावात जाऊन बसू, डोळ्यातील आसू… उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
जिनके इरादे बुलंद होते है, वही चट्टानों को गिराते है, काय म्हणाले एकनाथ शिंदे