शोधून शोधून अती मी थकले

शोधून शोधून अती मी थकले

>> प्रसाद ताम्हणकर

एआयवर आधारलेले Facial recognition अर्थात चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञानदेखील कधी कधी भन्नाट गंमती घडवत असते. एका स्कॉटिश फुटबॉल टीमने नव्या तंत्रज्ञानाची कास धरायचे ठरवले आणि मानवी कॅमेरामनच्या जागी एआय तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे सज्ज केले. मानवी बेहरा जसा ट्रॅक केला जातो, अगदी त्याच तंत्रज्ञानाने हे कॅमेरे फुटबॉलचा मागोवा घेणार होते. म्हणजेच बॉल जसा आणि जिथे फिरेल त्याचा वेध घेत कॅमेरे त्या त्या दिशेला वळणार होते. या अनोख्या तंत्रज्ञानाने फुटबॉल रसिकांची पर्वणी होणार असा अंदाज होता. मात्र जे काही सामन्यादरम्यान घडले ते विनोदी नाटकापेक्षा कमी नव्हते. फुटबॉलचा वेध घेणाऱ्या या कॅमेऱ्याच्या कृपेने टीव्हीवर सामना पाहणाऱ्या रसिकांना निम्मा सामना बघता आला नाही कारण हे कॅमेरे अनेकदा पंच असलेल्या एका व्यक्तीच्या गरगरीत टकलाला फुटबॉल समजत होते आणि तो पंच धावेल तिकडे त्याचे टक्कल ट्रॅक करून तेच सतत पड़द्यावर दाखवत होते. शेवटी वैतागलेल्या काही प्रेक्षकांनी टीमच्या व्यवस्थापनाला फोन करून एक तर प्रक्षेपण थांबवा किंवा त्या पंचाला तरी टोपी घालायची विनंती करा, अशी साद घातली. काही वर्षापूर्वी अ‍ॅमेझॉनच्या vaunted facial recognition softwareने त्यांच्याकडील काही राजकीय पक्षांच्या सदस्यांचे चेहरे खतरनाक गुन्हेगारांच्या चेहऱ्याशी मिळतेजुळते असल्याचे दाखवले होते. त्यावेळीदेखील हे प्रकरण बरेच चर्चेत आले होते. या सॉफ्टवेअरने केलेल्या या गंभीर चुकीवर बराच ऊहापोह झाला होता. अनेक संस्थांनी हे सॉफ्टवेअर नक्की करो काम करते, चेहरा स्कैन करण्यासाठी आणि तो दुसऱ्या चेहऱ्याशी पडताळण्यासाठी काय कसोटधा वापरल्या जातात, हे निष्कर्ष चुकीचे येण्याचे कारण काय असावे हे शोधण्यासाठी अनेक चाचण्या घेतल्या होत्या

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाळासाहेबांना अटक, अडवाणींनी फौज पाठवली… उद्धव ठाकरेंनी सर्वच काढलं बाळासाहेबांना अटक, अडवाणींनी फौज पाठवली… उद्धव ठाकरेंनी सर्वच काढलं
उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवा, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं होतं. अमित शाह यांच्या या विधानाचा समाचार...
‘जय श्रीराम’नंतर ‘जय शिवराय’ म्हटलंच पाहिजे; उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले
प्रेमाने वागाल तर उचलून देऊन, कपटाने वागाल तर… तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या काय?; ठाकरेंचा अमित शाह यांना सवाल
उद्धव ठाकरेंकडून ‘एकला चलो रे’चा नारा, नेमकं काय म्हणाले?
एक तरी निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवाच; उद्धव ठाकरेंचं उघड चॅलेंज
रुसूबाई रुसू, गावात जाऊन बसू, डोळ्यातील आसू… उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
जिनके इरादे बुलंद होते है, वही चट्टानों को गिराते है, काय म्हणाले एकनाथ शिंदे