ब्रेकअपनंतर मलायका-अर्जुन पुन्हा एकत्र? लिलावती रुग्णालयातून एकत्र पडले बाहेर

ब्रेकअपनंतर मलायका-अर्जुन पुन्हा एकत्र? लिलावती रुग्णालयातून एकत्र पडले बाहेर

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ब्रेकअप केला. अर्जुनने एका कार्यक्रमात सर्वांसमोर ‘मी आता सिंगल आहे’ असं म्हटलं होतं. त्यानंतर मलायकानेही अप्रत्यक्षपणे रिलेशनशिपमध्ये नसल्याचं स्पष्ट केलं होतं. ब्रेकअपनंतर नुकतंच या दोघांना मुंबईतील लिलावती रुग्णालयाबाहेर एकत्र पाहिलं गेलं. हे दोघं अभिनेता सैफ अली खानला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. सैफवर 16 जानेवारी रोजी त्याच्यात राहत्या घरात एका चोराने चाकूहल्ला केला होता. त्यानंतर लिलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. अर्जुन आणि मलायका या दोघांची सैफची पत्नी करीना कपूरशी खूप चांगली मैत्री आहे. लिलावती रुग्णालयाच्या बाहेरील अर्जुन आणि मलायकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावरील व्हिडीओमध्ये मलायका रुग्णालयातून बाहेर येताना दिसत आहे. त्यानंतर ती तिच्या कारच्या दिशेने चालत जाते. तिच्या मागून अर्जुनसुद्धा रुग्णालयातून बाहेर पडताना दिसतोय. यामुळे हे दोघं पुन्हा एकत्र आले का, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. अनेकांनी या दोघांना एकत्र पाहून आनंद व्यक्त केला आहे. अर्जुन आणि मलायकाची जोडी ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत चर्चेतल्या जोडींपैकी एक होती. या दोघांना वयातील अंतरामुळे अनेकदा ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता दोघांनी खुलेपणाने एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

दरम्यान घरात शिरलेल्या चोराने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या सैफ अली खानला मंगळवारी दुपारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. सैफवर दोन गंभीर शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्याची प्रकृती स्थित असल्याने लिलावती रुग्णलयातील डॉक्टरांनी त्याला घरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सैफच्या घरात 16 जानेवारी रोजी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास चोर शिरला होता. यावेळी या चोराशी झालेल्या झटापटीत सैफ जखमी झाला होता. या हल्ल्यात त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली असून दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतर सैफच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्याने पाच दिवसांनंतर त्याला घरी सोडण्याचा निर्णय रुग्णालयातील डॉक्टरांनी घेतला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सैफ अली खान नव्या वादाच्या भोवऱ्यात, 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता सरकार ताब्यात घेण्याची शक्यता सैफ अली खान नव्या वादाच्या भोवऱ्यात, 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता सरकार ताब्यात घेण्याची शक्यता
अभिनेता सैफ अली खान याच्यावर काही दिवसांपूर्वी चकू हल्ला झाला होता. त्यामुळे अभिनेत्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 5...
“त्यांच्यावर उधारी होती म्हणून..”; प्रायव्हेट व्हिडीओ लीकवरून पुन्हा बरळली उर्वशी
रुग्णालयातून बाहेर पडताच सैफ इतका फिट कसा? संजय निरुपम यांचा सवाल
तमन्ना भाटिया नव्या लूकमध्ये दिसतेय हुबेहूब राजकुमारी, लाल ड्रेसमध्ये फुललं अभिनेत्रीचं सौंदर्य
एक चुप, सौ सुख..; पतीकडून अत्याचारानंतर अभिनेत्रीला सासरच्यांनी दिला अजब सल्ला
Mahakumbh – महाकुंभमेळ्यात आता ‘रबडी’वाले बाबा चर्चेत, दररोज 150 लिटर दुधाची बनवतात रबडी
Santosh Deshmukh Case – वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी