शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त विविध उपक्रम

शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त विविध उपक्रम

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 23 जानेवारी रोजी असलेल्या जन्मदिनानिमित्त शिवसेना, युवासेना आणि विविध सामाजिक संस्थांतर्फे मुंबईसह राज्यभरात रक्तदान शिबीर, रुग्णांना फळवाटप अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

परळमध्ये अल्पोपाहार, फळांचे वाटप

परळ, लालबाग, शिवडी येथील ज्येष्ठ आणि निष्ठावंत सैनिक संघटनेतर्फे 23 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता परळ नाका येथील संत नामदेव महाराज उड्डाणपुलाखाली अल्पोपाहार आणि फळांचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थापक सुरेंद्र सावंत आणि अध्यक्ष विजय धामणकर यांनी दिली.

– शिवसेना शाखा क्र. 94 चे शाखाप्रमुख संदीप शिवलकर यांच्या वतीने खार येथे आयोजित रक्तदान शिबिरात 164 रक्तदात्यांनी रक्तदान केले. विभागप्रमुख आमदार अॅड. अनिल परब, शिवसेना-युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या हस्ते रक्तदात्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी विभाग संघटक सदा परब, पूजा सुर्वे, शेखर वायंगणकर, अनिल त्रिंबककर, शशिकांत येलमकर, उदय दळवी आदी उपस्थित होते.

– वर्सोवा विधानसभा शिवसेना शाखा क्र. 60 च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्र्रतिसाद मिळाला. उपविभागप्रमुख राजेश शेटये, शाखाप्रमुख सिद्धेश चाचे, शाखा संघटक अश्विनी खानविलकर यांनी आयोजित केलेल्या या शिबिरात 106 पिशव्या रक्त संकलन करण्यात आले. आमदार हारून खान, विधानसभा संघटक शैलेश फणसे, दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक पेंद्राचे अध्यक्ष विजय जाधव, कृष्णा पिंपळे, सदाशिव गांगुर्डे, विधानसभा समन्वयक शीतल सावंत, सुबोध चिटणीस, एकनाथ केरकर, रवी चिले, रमेश मालवणकर आदी यावेळी उपस्थित होते.

– शिवसेना शाखा क्रमांक 193 प्रभादेवीच्या वतीने शाखाप्रमुख संजय भगत यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, विभागप्रमुख- आमदार महेश सावंत, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, कामगार सेनेचे संजय कदम, विभाग संघटक श्रद्धा जाधव, आरती किनरे, सूर्यकांत बिर्जे, रश्मी सुर्वे, यशवंत विचले, हरीश वरळीकर, रेखा देवकार, हिरू दास, माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर, प्रीती पाटणकर, ज्योती भोसले, समर्थ व्यायाम मंदिराचे उदय देशपांडे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त कबड्डीपटू तारक राऊळ आदी उपस्थित होते.

दहिसरमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

शिवसेना विभाग क्र. 1 तर्फे 23 जानेवारी रोजी शाखानिहाय विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शाखा क्र. 1 तर्फे आरोग्य शिबीर, ई सेवा कार्ड वाटप, शाखा क्र. 3 तर्फे नेत्रचिकित्सा शिबीर, शाखा क्र. 4 तर्फे पुंभ मेळाव्यासाठी भाविकांना बस आणि डॉक्टरचे नियोजन, शाखा क्र. 5 तर्फे चित्रकला स्पर्धा, रुग्णांना फळवाटप, शाखा क्र. 6 आणि 7 तर्फे महा-ई-सेवा कार्ड व मतदार नोंदणी, शाखा क्र. 8 तर्फे वृक्षारोपण, शालांत परीक्षा सराव पत्रिका वाटप, शाखा क्र. 9 तर्फे फळवाटप, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, शाखा क्र. 10 तर्फे देहू आळंदी यात्रेसाठी विनामूल्य 2 बस, शाखा क्र. 11 तर्फे हळदीपुंकू, ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप, शाखा क्र. 12 तर्फे धूळ फवारणी, शाखा क्र. 13 तर्फे रक्तदान शिबीर, शाखा क्र. 14 तर्फे रुग्णालयात फळवाटप, शाखा क्र. 15 तर्फे ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप, शाखा क्र. 16 आणि 17 तर्फे शिर्डी दर्शन, चित्रकला स्पर्धा, शाखा क्र. 18 तर्फे ज्येष्ठांना ब्लँकेट वाटप, शाखा क्र. 25 तर्फे ई सेवा कार्यक्रम, शाखा क्र. 26 तर्फे आधार, पॅन, आभा कार्ड वाटप करण्यात येईल, अशी माहिती विभागप्रमुख उदेश पाटेकर यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Saif Ali Khan : सैफ अली खान याच्या दोन सुरक्षा रक्षकांनी केले हल्लेखोराचे काम सोपे, मुंबई पोलिसांचा धक्कादायक दावा, आरोपी घरात असा घुसला Saif Ali Khan : सैफ अली खान याच्या दोन सुरक्षा रक्षकांनी केले हल्लेखोराचे काम सोपे, मुंबई पोलिसांचा धक्कादायक दावा, आरोपी घरात असा घुसला
अभिनेता सैफ अली खान हा रुग्णालयातून दुसऱ्या घरी पोहचला आहे. तो तंदुरुस्त असल्याचे कालच्या दृश्यातून समोर आले आहे. 16 जानेवारी...
सरकारला पडला लाडक्या बहिणींचा विसर, 2100 रुपयांचं काय झालं ? राष्ट्रवादीच्या नेत्याचा सवाल
Saif Ali Khan attack : हल्ल्यापूर्वी नोकरी सोडली, चाकूही चोरला, सैफच्या हल्लेखोराबद्दल धक्कादायक माहिती उघड
हिंदू आहेस की मुस्लीम? ‘बिग बॉस 18’ फेम अभिनेत्रीला मुंबईत घर मिळेना; धर्माबद्दल विचारले जातायत प्रश्न
घशात अडकली बीपीची गोळी, श्वासात अडथळा अन्..; घाबरलेल्या झीनत अमान यांनी सांगितला अनुभव
सैफ अली खान याच्या शरीरावर जखमा, चाहत्यांना पाहताच म्हणाला…, व्हिडीओ व्हायरल
ब्रेकअपनंतर मलायका-अर्जुन पुन्हा एकत्र? लिलावती रुग्णालयातून एकत्र पडले बाहेर