तुर्की येथील स्की रिसॉर्टला आग, 66 जणांचा मृत्यू
वायव्य तुर्कीतील बोलू पर्वतावरील स्की रिसॉर्टला भीषण आग लागली असून या आगीत 66 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. अनेक पर्यटकांनी या रिसॉर्टच्या इमारतीच्या खिडक्यांमधून उड्या घेतल्या त्यातही काही पर्यटकांचा मृत्यू झाला. या आगीत 51 जण जखमी झाले आहेत.
पहाटे 3.30 च्या सुमारास 12 मजली हॉटेलच्या वरच्या मजल्यावर आग लागली आणि ती लगेचच संपूर्ण इमारतीत पसरली. हॉटेल धुराने भरले आणि हॉटेलची फायर डिटेक्शन सिस्टीम काम करत नव्हती. ही घटना घडली तेव्हा रिसॉर्टवर 234 पर्यटक होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List