मुंबईत भेट झाली, प्रेमात पडले अन् आता लग्न ठरले; गौतम अदानींच्या मुलाची विकेट काढणारी दिवा शहा कोण आहे?

मुंबईत भेट झाली, प्रेमात पडले अन् आता लग्न ठरले; गौतम अदानींच्या मुलाची विकेट काढणारी दिवा शहा कोण आहे?

अदानी समूहाचे अध्यक्ष, उद्योजक गौतम अदानी यांचा मुलगा जीत अदानी याचे लग्न ठरले आहे. 7 फेब्रुवारी 2025 रोजी जीत याचा विवाह सोहळा होणार आहे. हा सोहळा एकदम धुमधडाक्यात होईल अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र गौतम अदानी यांनी मुलाचे लग्न आपण पारंपरिक आणि साध्या पद्धतीने करणार असल्याचे स्पष्ट केले. या लग्नसोहळ्यात अदानी कुटुंबासह जवळचे लोक सहभागी होतील.

गौतम अदानी आणि त्यांच्या पत्नीने मंगळवारी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात श्रद्धेची डुबकी घेत हनुमान मंदिरात पुजा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी जीतच्या लग्नाची तारीख सांगितली. जीत आणि दिवाच्या लग्नाची तारीख निश्चित झाल्यापासून सोशल मीडियावर तिच्या नावाची चर्चा असून ती कोण आहे याचा शोध घेतला जात आहे.

कोण आहे दिवा जैमिन शहा?

अदानी कुटुंबात सून म्हणून येणाऱ्या तरुणीचे नाव दिवा जैमिन शहा आहे. सूरतमधील हिरे व्यापारी आणि सी. दिनेश अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेंडचे मालक जैमिन शहा यांची ती मुलगी आहे. सूरत आणि मुंबईमध्ये ही कंपनी हिऱ्याचा व्यवसाय करते. या कंपनीची सुरुवात चिनू दोशी, दिनेश शहा यांनी 1976 मध्ये केली होती. जैमिन शहा या कंपनीचे निर्देशक असून दिवाही वडिलांना व्यवसायात मदत करते.

मुंबईत भेट, प्रेम आणि 2023 मध्ये साखरपुडा

जीत आणि दिवा यांची भेट मुंबईत झाली होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. बराच काळ दोघे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. घरच्यांनीही संमती दिल्यानंतर 12 मार्च 2023 रोजी दोघांचा साखरपुडा झाला. अहमदाबादमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा अत्यंत गुप्तपणे पार पडला होता. दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र-मैत्रिणी या सोहळ्यात सहभागी झाले होते. मात्र आता गौतम अदानी यांनी दोघांच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे.

कोट्यवधींची मालकीण

दिवा जैमिन शहा हिच्याबाबत इंटरनेटवर जास्त माहिती उपलब्ध नाही. मात्र ती उच्चशिक्षित असून वडिलांना हिरे व्यवसायात मदत करते. ती कोट्यवधींची मालकीण असून लक्झरी लाईफ जगते. तर दुसरीकडे गौतम अदानी यांचा मुलगा जीत अदानी याने विदेशात उच्च शिक्षण घेतले आहे. 2019 मध्ये अदानी समूहाचा तो भाग बनला आणि सध्या तो फायनान्स ग्रुपचा उपाध्यक्ष आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सैफ अली खान नव्या वादाच्या भोवऱ्यात, 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता सरकार ताब्यात घेण्याची शक्यता सैफ अली खान नव्या वादाच्या भोवऱ्यात, 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता सरकार ताब्यात घेण्याची शक्यता
अभिनेता सैफ अली खान याच्यावर काही दिवसांपूर्वी चकू हल्ला झाला होता. त्यामुळे अभिनेत्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 5...
“त्यांच्यावर उधारी होती म्हणून..”; प्रायव्हेट व्हिडीओ लीकवरून पुन्हा बरळली उर्वशी
रुग्णालयातून बाहेर पडताच सैफ इतका फिट कसा? संजय निरुपम यांचा सवाल
तमन्ना भाटिया नव्या लूकमध्ये दिसतेय हुबेहूब राजकुमारी, लाल ड्रेसमध्ये फुललं अभिनेत्रीचं सौंदर्य
एक चुप, सौ सुख..; पतीकडून अत्याचारानंतर अभिनेत्रीला सासरच्यांनी दिला अजब सल्ला
Mahakumbh – महाकुंभमेळ्यात आता ‘रबडी’वाले बाबा चर्चेत, दररोज 150 लिटर दुधाची बनवतात रबडी
Santosh Deshmukh Case – वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी