मराठी सिक्युरिटी गार्डला मारहाण करणाऱ्या कंपनीला शिवसेनेचा दणका
दक्षिण मुंबईत न्यू सिक्युरिटी सर्व्हिस कंपनीच्या मालकाने या ठिकाणी काम करणाऱ्या मराठी मुलाला मारहाण केल्याच्या गंभीर प्रकाराची दखल घेत शिवसेनेने संबंधित कंपनीला चांगलाच दणका दिला. शिवसेनेच्या रुद्रावतारामुळे कंपनी मालक आणि त्याच्या भावाने संबंधित सिक्युरिटी गार्डची माफी मागितली.
दक्षिण मुंबईतील न्यू सिक्युरिटी कंपनीत शरद गोवेकर हा काम करतो. त्याला आपल्या आईच्या उपचारासाठी आगाऊ पैशांची गरज असल्याने तशी मागणी त्याने मालकाकडे केली होती. यावेळी पैसे देणार नाही आणि महिन्याचा पगारही देणार नाही असे म्हणून मालकाने त्याला धक्काबुक्की, मारहाण केली. याची माहिती मिळताच विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी कंपनीवर धडक देत कंपनी प्रशासनाला जाब विचारला. यावेळी हादरलेल्या कंपनी प्रशासनाने सिक्युरिटी गार्डची माफी मागत असा प्रकार पुन्हा घडणार नाही, असे आश्वासन दिले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List