अमेरिकेची जागतिक आरोग्य संघटनेतून माघार

अमेरिकेची जागतिक आरोग्य संघटनेतून माघार

डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर निर्णयांचा धडाका लावला. त्यांनी मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे तब्बल 78 निर्णय बदलले आहेत. अमेरिकेला जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर काढणे यांसारखे निर्णय ट्रम्प यांनी घेतले आहेत. तसेच यापुढे  20 जानेवारी हा दिवस अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन असेल असे त्यांनी सांगितले.

कोरोना काळात आजाराचे चुकीचे व्यवस्थापन आणि जागतिक आरोग्य संघटना तातडीने सुधारणा राबवण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ट्रम्प यांनी ठेवला आहे. याशिवाय आरोग्य संघटना अमेरिकेकडून जास्त आणि चीनकडून कमी पैसे घेत असल्याचा दावादेखील ट्रम्प यांनी केला.

अमेरिकेचे सर्वात तरुण उपराष्ट्राध्यक्ष

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वी जे. डी. व्हान्स यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. 40 वर्षीय व्हान्स हे अमेरिकेचे सर्वात तरुण उपराष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. जे. डी. व्हान्स यांची पत्नी उषा ही हिंदुस्थानी वंशाची असून दोघे तीन मुलांचे पालक आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्मताच अमेरिकेचे नागरिकत्व बहाल करणारा कायदा रद्द करण्याची घोषणा केली. कॅपिटल हिंसाचारामधील दोषींना माफी, अवैध स्थलांतरितांना बाहेर काढणे, मेक्सिको सीमेवर आणीबाणीची घोषणा, टिकटॉकवरील बंदी तूर्तास थांबवली, अमेरिका सरकारसाठी पुरुष आणि महिला असे दोनच लिंग असतील, पनामा कालवा परत घेणार, गल्फ ऑफ मेक्सिकोचे नाव बदलले, जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका बाहेर, पॅरिस करारातून अमेरिका बाहेर, इतर देशांवर शुल्क लादण्याची घोषणा, अमेरिकेत इलेक्ट्रिक वाहनांची गरज नाही, मंगळावर अंतराळवीर पाठवण्याची घोषणा, विदेशी शत्रू  कायदा 1978 लागू करणार आणि क्युबाचा पुन्हा एकदा दहशतवाद पुरस्कृत देशांच्या यादीत समावेश असे मोठे निर्णय ट्रम्प यांनी जाहीर केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पोलीस डायरी – बांगलादेशी कॅन्सर वाढतोय! सैफ अलीवर खरंच खंडणीसाठी हल्ला? पोलीस डायरी – बांगलादेशी कॅन्सर वाढतोय! सैफ अलीवर खरंच खंडणीसाठी हल्ला?
>> प्रभाकर पवार भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडी ऊर्फ टायगर व प्रख्यात अभिनेत्री शर्मिला टागोर यांचे...
ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळय़ात मस्क यांचा नाझी सॅल्यूट, सोशल मीडियावरून संताप
ईडीला सुप्रीम कोर्टाचा दणका, भुजबळांच्या जामिनाला दिलेले आव्हान फेटाळले
पालकमंत्र्यांची भूमिका काय? ग्रामस्थ अजित पवारांना भेटणार
मराठी सिक्युरिटी गार्डला मारहाण करणाऱ्या कंपनीला शिवसेनेचा दणका
बेस्ट वाचवण्यासाठी मुंबईकरांचा पुढाकार
पिलीभीत बनावट चकमकीचा बदला म्हणून महाकुंभात स्फोट घडवला, खलिस्तानी संघटनेचा दावा; मेलद्वारे स्वीकारली जबाबदारी