एका सेल्फीमुळे नक्षलवादी ‘चलपती’चा झाला भांडाफोड, त्याच्यावर होतं एक कोटीचं बक्षीस

एका सेल्फीमुळे नक्षलवादी ‘चलपती’चा झाला भांडाफोड, त्याच्यावर होतं एक कोटीचं बक्षीस

छत्तीसगड-ओडिशा सीमेजवळ गरियाबंद जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत 16 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. त्यात सीपीआय (माओवादी) या संघटनेच्या नेता प्रताप रेड्डी उर्फ चलपती याचाही समावेश होता. त्याला पकडण्यासाठी सरकारने 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. त्यानं सुरक्षा दलांवर अनेकदा भयंकल हल्ले केले होते.  मात्र एका सेल्फीमुळे त्यांचा भांडाफोड झाला.

चलपतीने गेल्या काही वर्षांत सुरक्षा दलांवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले होते. 2018 मध्ये दोन टीडीपी नेते मारले गेल्यानंतर चलपतीचे नाव प्रकर्षाने पुढे आले. आंध्रप्रदेशच्या चित्तूरमध्ये राहणारा चलपती लहान वयातच नक्षली चळवळीशी जोडला गेला होता. 23 डिसेंबर 2018 रोजी सुरक्षा दलांवर झालेल्या हल्यात देखील त्याचा हात होता. दोन टीडीपी आमदारांची हत्याही त्याच्याच सांगण्यावरून करण्यात आली होती. सीपीआय (माओवादी) संघटनेची लष्करी शाखा हाय-प्रोफाइल हल्ला ऑपरेशन्सची योजना करण्यासाठी आणि नवीन भरती करण्यासाठी त्याच्यावरच अवलंबून होती. तीन दशकांहून अधिक काळ त्याच्यावर आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात हल्ल्यांचे कट रचणे आणि ते पूर्णत्त्वात नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे सुरक्षा दलांकडून त्याचा शोध घेतला जात होता. त्याची माहिती देणाऱ्याला 1 कोटी रुपयांचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आलं होतं.

अनेक दशके भूमिगत राहिल्यानंतर मे 2016 मध्ये विशाखापट्टणममध्ये चकमकीत मारल्या गेलेल्या एका माओवादी नेत्याच्या लॅपटॉपमध्ये त्याचा आणि त्याच्या पत्नीचा सेल्फी सापडला. या सेल्फीवरून आंध्र प्रदेश पोलिसांना पहिल्यांदा चलपतीबद्दल माहिती मिळाली. अरुणा या माओवादी नेत्याशी त्याचे असलेले प्रेमसंबंध यामुळे त्याला त्याच्या संघटनेतून अडचणी येत होत्या. 2010 मध्ये त्याला अरुणा सोबत प्रेमसंबंध असल्याबद्दल एका वर्षासाठी निलंबित करण्यात आलं होतं. मात्र शेवटी त्यानं तिच्याशी लग्न केलं.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

धस, क्षीरसागर आणि टोपे एकाच माळेचे मणी…काय म्हणाल्या अंजली दमानिया ? धस, क्षीरसागर आणि टोपे एकाच माळेचे मणी…काय म्हणाल्या अंजली दमानिया ?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्ये प्रकरणातील आरोपींपैकी एका आरोपीने लातूर जेलमध्ये आपली रवानगी करावी असे मागणी कोर्टाकडे केली...
बाथरुममधील त्या व्हायरल व्हिडीओबद्दल अखेर बॉलिवूड अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं, म्हणाली ‘मीच सांगितलं…’
‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये अप्पीची भूमिका बदलणार? कथानकातील वळण पाहून प्रेक्षकांना शंका
‘तू बिग बॉसच्या ट्रॉफीच्या लायक नाहीस’, म्हणणाऱ्यांना करणवीर मेहराचं सडेतोड उत्तर
सैफ अली खानच्या सुरक्षेची जबाबदारी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या खांद्यावर, हल्ल्यानंतर मोठा निर्णय
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद; 35 लाखांच्या मेडिक्लेमवरून डॉक्टरकडून प्रश्न उपस्थित
अमिताभ बच्चन यांनी विकलं आलिशान घर, किंमत जाणून व्हाल थक्क, तब्बल 168 टक्के फायदा