Saif Ali Khan Attack – पोलिसांनी केला हल्ल्याचा सीन रिक्रिएट
अभिनेता सैफ अली खान याच्यावरील हल्लाप्रकरणी अटकेत असलेल्या मोहम्मद शरीफुल इस्लाम याला घेऊन आज पोलिसांनी हल्ल्याचा सीन रिक्रिएट केला. पोलिसांनी मोहम्मद शरीफुलला सैफ याच्या राहत्या इमारतीजवळ, वांद्रे, वरळी, दादर परिसरात नेले होते. सीन रिक्रिएटच्या माध्यमातून त्याने नेमका हल्ला कसा केला, त्यानंतर कुठे कुठे गेला होता याची माहिती जाणून घेतली.
अभिनेता सैफवरील हल्लाप्रकरणी बांगलादेशी मोहम्मद शरीफुल इस्लामला वांद्रे पोलिसांनी अटक केली. मोहम्मद शरीफुलने नेमका हल्ला कसा केला, हल्ल्यानंतर तो कुठे गेला हे जाणून घेण्यासाठी आज पहाटे पोलिसांचे पथक अभिनेता सैफ अली खान याच्या घराजवळ गेले. त्यानंतर त्याला वांद्रे येथील एका प्रसिद्ध महाविद्यालयाच्या बस स्थानक परिसरात आणले. तेथे आणून त्याने हल्ला केल्यावर काय केले हे जाणून घेतले. मोहम्मद शरीफुलला पोलीस बंदोबस्तात वरळी, दादर, परिसरात नेले होते. सीन रिक्रिएटच्या माध्यमातून पोलिसांना अनेक बाबींचा उलगडा करायचा आहे.
टोपी ठरणार महत्त्वाचा पुरावा
जेव्हा मोहम्मद शरीफुल हा पायऱ्याने चालत गेला तेव्हा त्याने टोपी बॅगेत ठेवली होती. सैफ अली खानच्या घरात जेव्हा झटापट झाली तेव्हा त्याच्या डोक्यावर टोपी होती. ती टोपी हा महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. तर हल्लेखोर मोहम्मद शरीफुलची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी फेशियल आयडी प्रणालीचा वापर केला होता.
तपास अधिकारी बदलला
सैफ हल्ला प्रकरणाचा तपास आता पोलीस निरीक्षक अजय लिंगनूरकर हे करणार आहेत. तपास अधिकारी बदलण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. हल्ला झाल्यानंतर सैफ अली याची मेड एलियामा फिलिप्स यांनी दिलेल्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. तेव्हा तो तपास पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्याकडे होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List