अमेरिकेतील 7.25 लाख हिंदुस्थानींवर टांगती तलवार
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता संपादन केल्यानंतर आता अमेरिकेत राहणाऱया 7.25 लाख हिंदुस्थानी नागरिकांवर टांगती तलवार आहे. राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध प्रवाशांवर घोषणा केली. यामुळे अवैधरीत्या 7.25 लाख हिंदुस्थानींच्या भविष्यावर टांगती तलवार उभी राहिली आहे. पीयू रिसर्च सेंटरच्या 2022 च्या माहितीनुसार, अमेरिकेत अवैधरीत्या राहणाऱया लोकांची संख्या 10 कोटी 10 लाखांपर्यंत पोहोचली आहे. यात 7 लाख 25 हजार हे हिंदुस्थानी नागरिक आहेत. डोनाल्ड ट्रम्पा यांनी म्हटले की, अमेरिका-मेक्सिको सीमेवर नॅशनल आणीबाणी जाहीर केली. अमेरिकेतील अवैध प्रवेश तत्काळ रोखला जाईल. सरकार लाखो अवैध प्रवासी देशातून परत जातील. त्यांना पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मेक्सिको आणि साल्वाडोरनंतर सर्वात जास्त अवैधरीत्या राहणाऱयांची संख्या भरमसाट वाढली आहे. अमेरिकेत मेक्सिकोची अवैध संख्या 40 लाख, एल साल्वाडोरची संख्या 7 लाख 50 हजार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या भूमिकेमुळे अमेरिकेत राहणाऱया अवैध रहिवाशांना जबर दणका बसला आहे. अमेरिका फर्स्ट अशी घोषणाच ट्रम्प यांनी केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List