पिलीभीत बनावट चकमकीचा बदला म्हणून महाकुंभात स्फोट घडवला, खलिस्तानी संघटनेचा दावा; मेलद्वारे स्वीकारली जबाबदारी

पिलीभीत बनावट चकमकीचा बदला म्हणून महाकुंभात स्फोट घडवला, खलिस्तानी संघटनेचा दावा; मेलद्वारे स्वीकारली जबाबदारी

प्रयागराज येथील महाकुंभात झालेल्या सिलेंडर स्फोटाच्या घटनेची जबाबदारी खलिस्तान जिंदाबाद फोर्स या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. अशा आशयाचा मेल प्राप्त झाला असून हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला असल्याचे म्हटले आहे. यामागे कोणालाही हानी पोहोचवण्याचा उद्देश नसून केवळ जोगी (मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ) आणि त्यांच्या कुत्र्यांसाठी हा इशारा होता. पिलीभीत बनावट चकमकीत आमच्या तीन भावांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ’खालसा’ तुमच्या अगदी जवळ आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, असे मेलमध्ये नमूद आहे.

फतेह सिंग बागी असा उल्लेखही मेलमध्ये आहे. रविवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास दोन सिलेंडरच्या स्फोटामुळे मोठी आग लागली. अग्निशमन दलाने अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले पण या दुर्घटनेत 180 तंबू जळाले.

गतवर्षी 23 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले होते. पंजाबमधील पोलीस चौकीवर हल्ला करून दहशतवाद्यांनी पिलीभीतमध्ये आश्रय घेतला होता. पंजाब पोलिसांनी पिलीभीत पोलिसांना माहिती दिल्यानंतर आरोपींना पंठस्नान घालण्यात आले. पोलिसांच्या चकमकीत जसनप्रीत सिंग, गुरविंदर सिंग आणि वीरेंद्र सिंग हे तीन दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून दोन एके-47 रायफल आणि दोन विदेशी पिस्तूल जप्त करण्यात आली.

सिलेंडरची तपासणी बंधनकारक

कुंभमेळ्यातील आगीच्या घटनेनंतर राज्य सरकारने सिलेंडर तपासणे अनिवार्य केले आहे. भाविकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने उत्तर प्रदेशच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने आज बैठक घेतली आणि सिलेंडर तपासणी अनिवार्य केली. या बैठकीत अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी, अग्निशमन दल, एलपीजी सिलेंडर वितरक आणि गॅस कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. बैठकीत जारी केलेल्या सूचनांनुसार सिलेंडर तपासणी बंधनकारक असेल. गळती आढळल्यास सिलेंडरचा पुरवठा बंद केला जाईल. उत्तर प्रदेश सरकारने निवेदनाद्वारे याबाबत माहिती दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सैफ अली खान नव्या वादाच्या भोवऱ्यात, 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता सरकार ताब्यात घेण्याची शक्यता सैफ अली खान नव्या वादाच्या भोवऱ्यात, 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता सरकार ताब्यात घेण्याची शक्यता
अभिनेता सैफ अली खान याच्यावर काही दिवसांपूर्वी चकू हल्ला झाला होता. त्यामुळे अभिनेत्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 5...
“त्यांच्यावर उधारी होती म्हणून..”; प्रायव्हेट व्हिडीओ लीकवरून पुन्हा बरळली उर्वशी
रुग्णालयातून बाहेर पडताच सैफ इतका फिट कसा? संजय निरुपम यांचा सवाल
तमन्ना भाटिया नव्या लूकमध्ये दिसतेय हुबेहूब राजकुमारी, लाल ड्रेसमध्ये फुललं अभिनेत्रीचं सौंदर्य
एक चुप, सौ सुख..; पतीकडून अत्याचारानंतर अभिनेत्रीला सासरच्यांनी दिला अजब सल्ला
Mahakumbh – महाकुंभमेळ्यात आता ‘रबडी’वाले बाबा चर्चेत, दररोज 150 लिटर दुधाची बनवतात रबडी
Santosh Deshmukh Case – वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी