Photo – नाकात नथ, कोल्हापूरी साज आणि हिरवा चूडा… येसूबाईंच्या भूमिकेतील रश्मिकाचा लूक पाहिलात का?
छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत छावा हा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. उद्या 22 जानेवारीला या चित्रपटाचा ट्रेलर लाँच होणार आहे. दरम्यान आज 21 जानेवारीला निर्मात्यांनी या चित्रपटात येसूबाईंची भूमिका साकारणाऱ्या रश्मिका मंदाना हिचा चित्रपटातील लूक शेअर केला आहे.
या चित्रपटातील रश्मिकाचे दोन फोटो समोर आले आहेत. दोन्ही फोटोत रश्मिका मराठमोळ्या लूकमध्ये दिसत आहे. नाकात नथ, भरजरी पैठणी, कोल्हापूरी साज, हिरवा चूडा, कपाळावर कुंकू या लूकमध्ये रश्मिका जबरदस्त दिसत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List