न्या. आलोक आराधे यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ
मुंबई उच्च न्यायालयाचे नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी मंगळवारी पदाची शपथ घेतली. राजभवन येथे छोटेखानी शपथविधी समारंभ पार पडला. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्य न्यायमूर्ती आराधे यांना पदाची शपथ दिली. त्यानंतर राज्यपालांनी न्यायमूर्ती आराधे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
शपथविधी समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च न्यायालयातील इतर न्यायमूर्ती उपस्थित होते. सुरुवातीला राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी न्यायमूर्ती आराधे यांच्या नियुक्तीबाबत केंद्र सरकारची अधिसूचना वाचून दाखवली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List